Dhule : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण: आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरी‎ अन् 35 हजारांचा दंड

या प्रकरणाचा पाेलिसांनी कसून तपास केला. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी या प्रकरणाची सखाेल चाैकशी केली. न्यायालयात देखील त्यांनी त्यांची प्रखर भूमिका नोंदविली.
ten years imprisonment for molesting minor girl dhule news sml80
ten years imprisonment for molesting minor girl dhule news sml80saam tv

Dhule News :

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आज (बुधवार) धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने एका आराेपीला दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 11 मार्च 2019 कालावधीत ही घटना घडली हाेती. आज या प्रकरणाचा न्यायालयाने निकाल दिला. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधित मुलीच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधत आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्या अनुषंगाने धुळे जिल्हा पाेलिस दलाने संबंधितावर गुन्हा नोंदविला.

ten years imprisonment for molesting minor girl dhule news sml80
Kolhapur : पन्हाळ्यातील धक्कादायक घटना... पत्रा सरकताच विद्यार्थिनी थेट एसटीच्या इंजिनमध्ये अडकली

या प्रकरणाचा पाेलिसांनी कसून तपास केला. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी या प्रकरणाची सखाेल चाैकशी केली. न्यायालयात देखील त्यांनी त्यांची प्रखर भूमिका नोंदविली. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत संपूर्ण कारवाई झाली. या आरोपीस पोक्सो कायदा अन्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे सत्र न्यायालयाने आरोपीला दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पस्तीस हजार रुपये दंड ठोठावला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

ten years imprisonment for molesting minor girl dhule news sml80
Dhule To Ayodhya MSRTC Bus : एसटी महामंडळाची धुळे ते अयाेध्या बस सेवा; जाणून घ्या तिकीट दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com