शिक्षक नेत्यांनाे! विनापरवानगी जिल्हा किंवा तालुका मुख्यालयात जाताय, मग ही बातमी वाचाच

शिक्षकांना निर्बंध घातल्याने आता प्रशासन विरुद्ध शिक्षक संघटना पदाधिकारी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

औरंगाबाद - शिक्षक नेत्यांनो खबरदार विनापरवानगी जर जिल्हा किंवा तालुका मुख्यालयात फिरकाल तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना दिला आहे. विनापरवानगी जिल्हा किंवा तालुका मुख्यालयात फिरकाल तर खबरदार अशा सज्जड शब्दात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी शिक्षकांना निर्बंध घातल्याने आता प्रशासन विरुद्ध शिक्षक संघटना पदाधिकारी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी एक ऑगस्ट रोजी जिल्हाभरातील सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी असे म्हटले आहे की,जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिनस्त कार्यरत जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आणि तालुक्याच्या विविध विभागात उपस्थित असतात.

हे देखील पाहा -

सदर उपस्थितीबाबत त्यांनी त्यांच्या मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख,गटशिक्षणाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेतलेली नसते.त्यामुळे अध्यापनावर विपरीत परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.अशा शिक्षकांचे अध्यापनाचे आवश्यक असलेले १८० ते २२० वार्षिक शिकवण्याचे दिवस कसे पूर्ण होऊ शकतात ? ही बाब विचार करण्यासारखी आहे.

Aurangabad News
शंभूराज देसाईंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा जलवा

तरी या पत्राद्वारे सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, जिल्हा मुख्यालयातील दैनंदिन कामकाजासाठी एका कर्मचाऱ्याची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करावी. याव्यतिरिक्त काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जिल्हा परिषदेच्या किंवा तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित राहायचे असल्यास त्यांनी त्यांच्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी व जिल्हा परिषदेच्या किंवा तालुक्याच्या मुख्यालयात आल्यानंतर पूर्वपरवानगीचे पत्र दर्शवून अभिप्राय पुस्तिकेत तशी नोंद करावी. याव्यतिरिक्त इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा परिषदेच्या किंवा तालुक्याच्या मुख्यालयात आढळून आल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असेही पत्रात नमूद आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com