Property Tax: करदात्याचा कारनामा, थेट 93 हजारांची चिल्लर घेऊन नगरपालिकेत

एक व्यक्ती मालमत्ता कर भरण्यासाठी चक्क 93 हजार रुपयांची चिल्लर घेऊन खामगाव नगरपालिकेत पोहोचला.
Property Tax
Property TaxSaam Tv

बुलडाणा: गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील तो सीन तुम्हाला नक्कीच लक्षात असेल, जेव्हा मकरंद अनासपुरे निवडणुकीसाठी 25 हजार रुपयांची अनामत रक्कम चिल्लर स्वरुपात भरायला घेऊन येतो. असाच काहीसा प्रकार बुलडाणा येथील खामगावात घडलाय. येथे एक व्यक्ती मालमत्ता कर भरण्यासाठी चक्क 93 हजार रुपयांची चिल्लर घेऊन खामगाव नगरपालिकेत पोहोचला. हे पाहून कार्यालयात एकच गोंधळ उडाला (Taxpayer Came To Nagar Palika With Coins Cost Of 93 Thousands And 833 Rs To Pay Property Tax In Khamgaon Buldana).

Property Tax
औसा इथं नगरपालिका प्रभाग रचनेत खाजगी व्यक्ती सहभागी; नगरसेवकांचा आरोप

नेमकं प्रकरण काय?

सध्या प्रत्येक नगरपालिकेत (Nagar Palika) मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुली जमा करण्याचं काम सुरुये. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मालमत्ता कर (Property Tax), नळपट्टी कर, आदी कर वसूल केला जातो. त्यासाठी नागरिक सुद्धा नगरपालिकेत गर्दी करताना दिसतात. असाच मालमत्ता करधारक खामगाव (Khamgaon) नगरपालिकेत कर भरण्यासाठी पोहोचला.

झाले असे की, खामगाव येथील जगदीश कल्याणदास बोहरा यांच्याकडे मालमत्ता कर 93 हजार 833 रुपये बाकी होता. ते कर भरण्यासाठी बोहरा हे 1, 2 आणि 5 रुपयांची नाणी असे 93 हजार 833 रुपयांची चिल्लर घेऊन नगरपालिकेत पोहोचले. तेव्हा एवढी चिल्लर पाहून कर्मचारी चकित झाले. हे केव्हा मोजायचे असा प्रश्न त्यांना पडला. आजच्या परिस्थितीत व्यवहारात काही नाणी घेतल्या जात नाहीत तेव्हा नागरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फक्त 20 हजार रुपयांची नाणी स्वीकारली आणि बाकी रक्कम टप्या टप्प्याने भरण्याचे सुचविले

मात्र, या घटनेवरून एका चित्रपटाची आठवण होते. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील एका दृश्याची प्रचिती खामगाव नगरपालिकेत आली. या चित्रपटात मकरंद अनासपुरे निवडणुकीसाठी 25 हजार रुपयांची अनामत रक्कम चिल्लर स्वरुपात भरायला घेऊन येतो आणि हे पैसे मोजत मोजता निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ येतं.

तोच फंडा एका चिप्स व्यावसायिकाने अंमलात आणला. मालमत्ता कर भरा असा तगादा लावल्याने त्यांनी 4 कॅरेटमधून 93 हजार 833 रुपयांची चिल्लर नगरपालिकेच्या कर विभागात आणली. यामुळे कर विभागात तारांबळ उडाली. अखेर तांत्रिक कारणास्तव 20 हजार रुपयांची चिल्लर स्वीकारुन उरलेली रक्कम टप्याटप्प्याने भरण्याचे सांगण्यात आले.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com