CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल बदनामीकारक स्टेट्स ठेवले; एनसी दाखल

शिवसैनिक काही काळ आक्रमक झाले हाेते.
Crime
CrimeSaamTv

सांगली : सांगलीच्या तासगाव येथे एकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक स्टेट्स ठेवल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे तासगाव येथील शिवसैनिकांनी संबंधित व्यक्ती विराेधात पोलीस (police) ठाण्यात तक्रार केली.

Crime
पीव्ही सिंधूने पटकाविले Syed Modi International Badminton चे अजिंक्यपद; मालविका बनसाेड उपविजेती

या तक्रारीची दखल घेत तासगाव पोलीसांनी संबंधित व्यक्ती विराेधात अदखलपात्र गुन्हा (Crime) दाखल केला आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीस शिवसैनिकांनी (shivsena) माफी मागायला भाग पाडले. यावेळी संबंधित व्यक्तीने पुन्हा असे घडणार नाही अशी ग्वाही पाेलिसांना दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याबद्दल जर काेणी चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमातून लिखाण करीत असेल तर त्यास शिवसैनिक त्यास साेडणार नाहीत. कायदेशिर मार्गाने त्यास प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

edited by : siddharth latkar

Crime
M Venkaiah Naidu Covid Positve: उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना काेराेनाची लागण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com