एफआरपीसाठी 'स्वाभिमानी' आक्रमक; ऊसाच्या ट्रॅक्टरची तोडफोड

swabhimani shetkari sanghtana
swabhimani shetkari sanghtana

सांगली : वाळवा तालुक्यात ऊसदर आंदोलन पुन्हा पेटले आहे. बुधवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी इस्लामपूर-बावची फाट्या दरम्यान राजारामबापू, हुतात्मा विश्वास साखर कारखान्याकडे निघालेल्या ३० ते ३५ ट्रॅक्टरची हवा सोडून तोडफोड केली. swabhimani shetkari sanghtana demands one time frp amount for sugarcane

swabhimani shetkari sanghtana
DCC त उदयनराजे सुटले; सहकारमंत्र्यांपुढे उंडाळकरांचे आव्हान

सांगली जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. तरीही कारखान्यांनी ऊस तोडी गतीने सुरू केल्या आहेत. एकरकमी एफआरपीसाठी कारखान्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

दोन दिवसांपूर्वी गांधीगिरी मार्गाने शेतकऱ्यांना, वाहतूकदारांना गुलाब पुष्प देवून आंदोलन करण्यात आले होते. बुधवारी रात्री बावची फाटा ते इस्लामपूर दरम्यान राजारामबापू, हुतात्मा, विश्वास साखर कारखान्याकडे निघालेली वाहने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली. यावेळी चाकातील हवा सोडून, वाहनांची तोडफोड केली. काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे वाहनधारकांनी ऊस वाहतूक करू नये अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com