'B-TECH' 'BCA' चे विद्यार्थी निघाले मंगळसूत्र चोर; चार आरोपी अटकेत

अटक केलेल्या चौघांपैकी एक जण नागपुरात बीटेक, तर दुसरा शहरात बीसीएला आहे.
'B-TECH' 'BCA' चे विद्यार्थी निघाले मंगळसूत्र चोर; चार आरोपी अटकेत
'B-TECH' 'BCA' चे विद्यार्थी निघाले मंगळसूत्र चोर; चार आरोपी अटकेत Saam TV

अमरावती : अमरावती शहरातील साईनगर परिसरात पायी फिरत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने पळवले. दरम्यान चोरटा पळत असतानाच त्याचा मोबाइल खाली पडला अन् नागरिकांच्या हातात लागला. या मोबाईलच्या आधारे राजापेठ पोलिसांनी मंगळसूत्र उडवणाऱ्या दोन चोरट्यांसह त्यांना सहकार्य करणारे दोन अशा एकूण चौघांना सोमवार, १३ डिसेंबरला अटक केली. अटक केलेल्या चौघांपैकी एक जण नागपुरात बीटेक, तर दुसरा शहरात बीसीएला आहे.

रोहन ज्ञानेश्वर टिके (२३, रा. शेलू, वर्धा), प्रतिक सुनील वाणी (२२, आंजी, वर्धा), प्रतिक प्रकाश काळे (२३, आंजी, वर्धा) आणि आयुष रमेश चांदेकर (२२, वर्धा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रोहन टिके हा मूळचा वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. मात्र वर्षभरापूर्वीपर्यंत तो दिल्लीत राहत होता. त्या काळात दिल्लीतही त्याने मंगळसूत्र चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्याच्याविरुद्ध दिल्लीतील विविध पोलिस ठाण्यात मंगळसूत्र चोरीसह विविध प्रकरणाचे २० ते २२ गुन्हे दाखल असल्याची माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com