आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्याच्या वादातुन तुफान दगडफेक; गाड्यांचे नुकसान

आतापर्यंत 15 संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
Nandurbar News
Nandurbar NewsSaam Tv

नंदुरबार - आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस ठेवण्याच्या वादातुन अक्कलकुवा येथे काल मध्यरात्री तुफान दगडफेक करण्यात आली असून, दुचाकीसह, चार चाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच मध्यरात्रीच पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस (Police) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आतापर्यंत 15 संशयित आरोपींना अटक (Arrest) करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी दिली आहे.

हे देखील पाहा -

राज्यातील इतर भागांमध्ये सुरू असलेल्या नुपुर शर्मा मोहम्मद पैगंबर प्रकरण वादाचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात पाहायला मिळाले आहे. आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस ठेवण्याच्या वादातुन काल मध्यरात्री 12 वाजेनंतर तुफान दगडफेक झाली आहे. पोलिसांनी समज दिल्यानंतरही पोलीस स्टेशन मधुन परतत असतांना काही जणांनी केलेल्या दगडफेकीनंतर वातावरण चिघळले होते. अक्कलकुवा शहरातील झेंडा चौक, बाजार पेठ, तळोदा नाका, मरीमता मंदिर परिसरात दुचाकी व चारचाकी गाड्यांचे दगडफेकीत नुकसान झाले आहे.

Nandurbar News
Rajya Sabha Election 2022: धनंजय महाडीक यांचा 'विजय'; पुण्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

अक्कलकुवा शहरात सध्या तणावपुर्ण शांतता असून नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्यासह पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी अक्कलकुव्यात दाखल झाले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल अशा अफवांना बळी पडू नये असे आव्हान पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com