Buldhana News: कोंबिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करून हल्ला; दोन पोलीस कर्मचारी जखमी

या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांवर जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय..?
Buldhana News
Buldhana NewsSaam Tv

Buldhana News Today: बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरीअडगाव येथे एका घरी दरोडा पडला. या घटनेनंतर त्याच रात्री चार वाजताच्या सुमारास पोलिसांनी फत्तेपूर येथील एका वस्तीवर कोंबिग ऑपरेशन राबवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर स्थानिक पुरुषांसह महिलांनी देखील शिवीगाळ करत, लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

Buldhana News
Odisha Train Accident: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा लोकार्पण सोहळा रद्द; ओडिशा अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

पोलीस (Police) नाईक युवराज राठोड यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राजू भोसले, विजू भोसले, लहू धंदरे, सविता भोसले, मंदा भोसले, गीता पवार यांच्यासह इतर 20 जणांवर गैर कायद्याची मंडळी जमवने, त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा निर्माण करून, मारहाण केल्या संदर्भात त्यांच्यावर कलम 353, 332, 136, 186, 143, 147, 148, 149, 504 व 506 भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Buldhana News
PM Modi on Odisha Train Accident : 'ओदिशातील रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो', PM मोदींनी व्यक्त केले दुःख

मात्र दुसरीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मारहाण झाली नसल्याची चुकीची माहिती दिल्याचे समोर आले आहे. परंतु या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांवर जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय..? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com