राज्य उत्पादन शुल्क पथकांची धडक कारवाई; ७२ हजार ७५० रुपयांचा हातभट्टीचे रसायन जप्त

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
Latur News
Latur NewsSaam Tv

लातूर - उदगीर (Udgir) तालुक्यात विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department) पथकाने धडाकेबाज कारवाई करीत ७२ हजार सातशे ५० रुपयांचे हातभट्टी दारूचे रसायन जप्त करून कारवाई केली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध हातभट्टी विक्री करणाऱ्याचे धाबे दणालेले आहेत.

हे देखील पहा -

उदगीर तालुक्यातील हकनकवाडी राठोड तांडा येथे दोन ठिकाणी हातभट्टी गळण्याचे १४०० लिटर रसायन एकूण किंमत ३५ हजार ७०० रुपये, डोंगरशेळकी तांडा येथे दोन ठिकाणच्या धाडीत १२०० लिटर हातभट्टीचे रसायन एकूण ३४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आय.टी आय कॉलेज जवळ ५५ लिटर गावठी हातभट्टी २७५० रुपये असे एकूण ७२ हजार ७५० रुपयाचे हातभट्टीचे रसायन व गावठी दारू जप्त केली आहे.

Latur News
अल्पवयीन मुलीचा विनयभंग, राष्ट्रवादीच्या नेत्याचं पोलिसात आत्मसमर्पण

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. विशेष मोहिमेत निरीक्षक आर एम चाटे, निरीक्षक राहुल बांगर,दुय्यम निरीक्षक विजय राठोड, दुय्यम निरीक्षक पाचपोळे, दुय्यम निरीक्षक अमोल शिंदे, दुय्यम निरीक्षक माटेकर यांनी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश बाजरगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया प्रमाणावर गावठी हातभट्टीचे रसायन जप्त करून कारवाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com