कोरोना नियम पाळून शाळा सुरू करा; पालकांसह शिक्षक आक्रमक!

प्रार्थना मंदिरे सुरू आहेत तर ज्ञानमंदिरे बंद का?
school
schoolSaam Tv

बीड : कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात. अशी मागणी बीडमध्ये जोर धरू लागली आहे. यासाठी पालक शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बीडच्या लिंबागणेश येथील विद्यार्थ्यांनी चक्क मुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना सामुहिक पत्र लिहून बंद असलेल्या शाळा (School) सुरू कराव्यात. आम्ही आमची काळजी घेऊ. अस पत्रामध्ये विद्यार्थीनी म्हटलं आहे. तसेच या गावातील जागृत असलेल्या भालचंद्र गणपतीकडे प्रार्थना देखील केली आहे.

हे देखील पहा :

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमीच आहे. ज्या गावात कोरोनाचे (Corona) रुग्ण नाहीत, ज्यांचे गल्लीमध्ये कोरोणाचे रुग्ण आढळून येत नाहीत. त्या ठिकाणच्या शाळा सुरू कराव्यात. अशी मागणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षण तज्ञ मनोज जाधव यांनी केली आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी आहे, त्याचबरोबर त्यांच्या भविष्याची देखील चिंता आहे, त्यामुळे कोरोना नियम पाळून, 50 टक्के क्षमतेने तरी शाळा सुरू व्हाव्यात. अशी मागणी पालक करत आहेत.

राज्य शासनाच्या शाळा बंद निर्णयासंदर्भात विरोधाभास पाहायला मिळत आहे. एकीकडे बार चालू आहेत, बाटली चालू आहे. दुसरीकडे शिस्त पालन करणारे विद्यार्थी व शाळा बंद केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने (State Government) ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण कमी आहेत. त्या ठिकाणच्या शाळा सुरू कराव्यात. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांनी केली आहे.

school
रुग्णालयाच्या मनमानीमुळे राहुरीमध्ये भर रस्त्यातच महिलेची प्रसूती!

शाळा बंद असल्यामुळे आम्हाला ऑनलाईन (Online) शिक्षण घेता येत नाही व शिकवलेले काही समजत नाही. यातच दिवसभर काय करावे ? हा प्रश्न आमच्यासमोर असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण नाहीत त्या ठिकाणच्या शाळा सुरू कराव्यात. अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

बार, सलुन आदिंना ५० टक्के क्षमतेने परवानगी देणा-या शासनाने, शिक्षणाला मात्र दुय्यम स्थान देऊन ऑनलाइन शिक्षण पद्धती अंगीकारून शिक्षणाचा खेळखंडोबा केलाय. त्यामुळं तात्काळ शाळा सुरू न केल्यास पालकांचा आक्रोश वाढत असुन आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे पालकांचा अंत पाहु नये, नियम व अटींसह परवानगी देण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केले आहे.

school
जालन्यात वाळू माफियांकडून महसूल विभागाच्या पथकावर हल्ला!

दरम्यान, मुख्यमंत्र्याना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये विद्यार्थी मयुरेश लिंबेकर, स्वप्निल ढवळे,आर्यन फाळके, यश गायकवाड, निखिल वायभट, रूद्र वाणी, शिवानी आबदार, अक्षरा लगास, अजित जाधव, संस्कार यासुकाळे, रिद्धी जाधव, निखिल गिरे, वरद साळवे, गणेश वैद्य, आनंदी आवसरे यांचा समावेश आहे. त्यामुळं आता शासन आणि सरकार काय भूमिका घेणार ? येणाऱ्या काळात पालक काय करणार ? हेच पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com