ST Strike : कृती समितीतील तीन संघटना महाविकास आघाडीच्याच; कर्मचाऱ्यांचा आरोप!

चर्चेसाठी काँग्रेसची इंटक, शिवसेनेची कामगार सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगार संघटना या सरकारच्या पक्षातील संघटनेचे कृती समितीतील सदस्य उपस्थित होते; कर्मचाऱ्यांचा आरोप
ST Strike : कृती समितीतील तीन संघटना महाविकास आघाडीच्याच कर्मचाऱ्यांचा आरोप!
ST Strike : कृती समितीतील तीन संघटना महाविकास आघाडीच्याच कर्मचाऱ्यांचा आरोप!राजेश भोस्तेकर

-- राजेश भोस्तेकर

रायगड : एसटी कर्मचाऱ्याच्या संपाची हाक अलिबाग आगाराने आणि कनिष्ठ वेतन कर्मचारी संघटनेने दिली होती. कृती समितीत राज्यातील बावीस संघटना आहेत. आझाद मैदानावर 18 संघटनेचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. मात्र मंत्री महोदयासोबत चर्चेला काँग्रेसची इंटक, शिवसेनेची कामगार सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगार संघटना या सरकारच्या पक्षातील संघटनेचे कृती समितीतील सदस्य उपस्थित होते.

हे देखील पहा :

त्यामुळे ज्यांनी संपाची हाक दिली त्यांच्यासोबत शासनाला चर्चा करायला वेळ नाही. असा आरोप अलिबाग आगारातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. आमची आजही विलीनीकरणाची मागणी ही ठाम आहे. अशी भूमिका अलिबागमधील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

ST Strike : कृती समितीतील तीन संघटना महाविकास आघाडीच्याच कर्मचाऱ्यांचा आरोप!
विरार मध्ये तरुणावर चॉपर ने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद; पहा Video
ST Strike : कृती समितीतील तीन संघटना महाविकास आघाडीच्याच कर्मचाऱ्यांचा आरोप!
देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!

जिल्ह्यात पाच आगारातील कर्मचारी हे पुन्हा कामावर रुजू झाले असले तरी ते कर्मचारी संख्येपेक्षा दोन टक्केच आहेत. पुन्हा हे कर्मचारी संपात सहभागी होतील अशी आशा आहे. ज्यांनी अधिकृत संपाची हाक दिली त्यांना बाजूला ठेवून ज्याचा काहीही संबंध नाही अशांना बोलणी करण्यासाठी बोलवता, ज्याचा संबंध नाही ते आम्हाला संप मोडीत काढून कामावर हजर होण्याचे आदेश देत आहेत. त्यामुळे हे सदस्य संपावर तोडगा काढण्यासाठी गेले होते की मोडीत काढण्यासाठी असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com