...अन्यथा संघर्ष अटळ आहे! ST कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी पडळकर मैदानात

मोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातला प्रवासी आजही एसटीने प्रवास करतो.
...अन्यथा संघर्ष अटळ आहे! ST कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी पडळकर मैदानात
...अन्यथा संघर्ष अटळ आहे! ST कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी पडळकर मैदानात

सांगली: भाजप आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे आता बैलगाडी नंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यासाठी आणि हक्कासाठी लढा उभारनार आहेत. मी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा आहे. मी राज्य सरकारडं मागणं आहे की 'जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्या ‘ अन्यथा संघर्ष अटळ आहे. या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या २१ सप्टेंबरला सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथे या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण तिथे जास्त संख्येनं यावं असे आव्हान गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

...अन्यथा संघर्ष अटळ आहे! ST कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी पडळकर मैदानात
निरोप बाप्पाला : लालबागच्या राजाच्या विसर्जनाची जय्यत तयारी

मोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातला प्रवासी आजही एसटीने प्रवास करतो. पण आपल्या त्यागानं व सेवेने एसटी महामंडळला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची ही वेळ यावी, ही राग आणि अपमान वाटणारी बाब आहे. एकतर तुटपुंजा पगार त्याचाही वेळेवर पत्ता नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत.

महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्ठीसाठी हजारो कोटीचे टेंडर काढ़ुन खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जाते, पण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत. हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चाललंय. परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाजे कोण. या सर्व विरोधात ज्या युनियने आवाज उठवायला पाहिजे तेच आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com