Nashik Bus Fire : नाशिकमध्ये धावत्या ST बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप

नाशिकमध्ये धावत्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे.
Nashik Bus Fire
Nashik Bus Fire Saam tv

तबरेज शेख

नाशिक : नाशिकमधून मोठी बातमी हाती आली आहे. नाशिकमध्ये धावत्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने प्रवाश्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनसुसार, नाशिकच्या उपनगर परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या एसटी बसला आग (Fire) लागली. या घटनेने प्रवाश्यामंध्ये एकच भीती पसरली. नाशिकहून प्रवाश्यांना घेऊन ही बस शिर्डीकडे जात होती.

Nashik Bus Fire
Yavatmal Fire News : शेतक-याच्या स्वप्नांची झाली राख रांगाेळी; कुटुंबाला बसला माेठा धक्का

उपनगर परिसरात ही बस (Bus) पोहोचताच बसमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तात्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवून तात्काळ प्रवाश्यांना खाली उतरून दिले.तर खबरदारी म्हणून यावेळी नाशिक-पुणे रोड वरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.

Nashik Bus Fire
Solapur Fire News : दुमजली किराणा दुकनाला भीषण आग, लाखाेंचे नुकसान

बसचा चालक आणि वाहकाच्या तात्काळ बस ला आग लागल्याची बाब लक्षात आल्याने त्यांच्या प्रसंगवधना मुळे मोठा अनर्थ होता होता टळला आहे.याबाबत तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून या आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे नागरिकांनी एकच सुटकेचा निश्वास घेतला.

याआधी देखील बस ला आग लागून झालेल्या दुर्घटनेत अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.आज बसला लागलेल्या आगीमुळे मागील बस दुर्घटनेचे नागरिकांना पुन्हा एकदा आठवण झाली होती..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com