Solapur Rain| अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावासाने उडवली दैना; अनेक गावांचा संपर्क तुटला

राज्यातील कोकणात पावसाचा जोर कमी झाला असताना सोलापुरात मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे.
solapur rain news
solapur rain news saam tv

Solapur Rain News : राज्यातील कोकणात पावसाचा जोर कमी झाला असताना सोलापुरात मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोलापूरच्या (Solapur) अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे गावातील अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. या पावसामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांचे अतोनत नुकसान झाले आहे.

solapur rain news
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचे ठरले; पाहिल्या टप्प्यात BJP - शिंदे गटाला किती मंत्रिपदे?

सोलापूरच्या बोरगावमध्ये ढगफुटी सदृश्य पावासामुळे अनेक ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे गावातील जनजीवन विक्सळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे कुरनुर धरणातून ६०० क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. आश्लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोसळगाव, किणीवाडी यांसह आदी गावात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे हे दोन तलाव १०० टक्के भरले

घोळसगाव येथील तलाव १०० टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. बोरगाव येथील पीर राजेबागसवार साठवण तलाव १०० टक्के भरले असून बोरगावचा ओढा दुथडी भरून वाहत आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, बादोले, वागदरी, शिरवळ सापळे आदी भागात बुधवारी दुपारी दोन वाजता सुरु पाऊस सुरू झाला. या मुसळधार पावसामुळे ऊस, मुग, उडीद ,सोयाबीन, तूर आदी पिके खराब होण्याच्या मार्गावर आहेत. कामात व्यस्त असातना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

solapur rain news
TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार ; 'इतक्या' उमेदवारांवर होणार कारवाई

दरम्यान, समाधानकारक पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. वर्षभर पुरेल इतके पाणी या भागातील जलस्त्रोतात उपलब्ध झाले आहे.मात्र, काही भागात उभे असलेले उसाचे पीक आडवे पडले असून काही भागात मोठे नुकसान झाले आहे.बोरगाव नजीक असलेल्या पुलावर भरपूर पाणी वाहत असल्याने दुपार पासून घोळसगाव आणि वागदरी कडे जाणाऱ्या लोकांचा मार्ग बंद पडला. त्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com