ठरलं तर! विठ्ठल रुक्मिणीसाठी साेन्याच्या विटा नव्हे, अलंकार

vitthal rukmini pandharpur
vitthal rukmini pandharpur

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर vitthal rukmini mandir समितीला भाविकांनी भेट आणि दान दिलेल्या २८ किलो सोन्याचे दागिने वितळवून त्यापासून नवे अलंकार बनविले जाणार आहेत. त्याबाबतचा ठराव नुकताच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केला आहे. त्यामुळेविठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यात नव्या अलंकाराची भर पडणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माध्यमांशी बाेलतना दिली. Pandharpur Latest Marathi News

vitthal rukmini pandharpur
महाराष्ट्र कन्येने पटकाविला मल्लखांबाचा पहिला 'अर्जुन' पुरस्कार

गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनास येताना भाविक त्यांच्या परीने दान अर्पण करीत असतात. श्री विठ्ठल रुक्मिणीला अनेक प्रकारचे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने दान स्वरुपात आलेले आहेत. सन १९८५ पासून मंदिर समितीस सुमारे २७ किलो वजनाचे सोन्याचे दागिने मिळालेले आहेत. याबराेबरच ९९६ किलो चांदी आहे. या पूर्वी मंदिर समितीने हे दागिने वितळवून त्याच्या सोन्याच्या विटा करण्याचा निर्णय घेतला होता. मंदिर समितीने निर्णय बदलला असून देवास नवीन अलंकार बनवण्याचा नवा ठराव समितीने मंजूर केला. विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

विठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यात सोने, पाचू ,हिरे ,माणिक, मोती यापासून बनवलेले अनेक पारंपारिक व मौल्यवान दागिने आहेत. या दागिन्यांमुळे विठ्ठल रुक्मिणीचे रूप अधिकच खुलून दिसते. हे मौल्यवान अलंकार देवाला विविध सण आणि समारंभाच्या निमित्ताने परिधान केले जातात.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com