Nashik News : ऐन दिवाळीत ठाकरे विरुद्ध शिंदे गटात फटाके; पोलिसांनी कार्यालयाला ठोकले टाळे

कामगार सेना आणि कार्यालयाच्या अधिकारावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद.
Nashik News
Nashik NewsSaam TV

नाशिक : नाशिक (Nashik) महापालिकेतील शिवसेना प्रणित म्युन्सिपल कामगार सेनेचे कार्यालय सील करण्यात आलं आहे. कामगार सेना आणि कार्यालयाच्या अधिकारावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद निर्माण झाल्यामुळे, पोलिसांनी थेट कारवाई करत कामगार सेनेचे कार्यालयच सील केलं आहे. (Nashik Municipal Corporation)

नाशिकमध्ये आता ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या (Thackeray vs Shinde group) नव्या वादाचा अंक सुरु झाला आहे. कामगार संघटना आणि कार्यालय पळवापळवीवरून दोन्ही गटात ऐन दिवाळीत जोरदार फटाके वाजायला सुरुवात झाली आहे. महापालिकेतील शिवसेना प्रणित म्युन्सीपल कामगार सेना कुणाची यावरुन आता वाद सुरु झाला असून तो पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला आहे.

पाहा व्हिडीओ -

महापालिकेतील शिवसेना प्रणित म्युन्सीपल कामगार सेनेवर दोन्ही गटांनी आपला दावा सांगितला या कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे (Praveen Tidme) शिंदे गटात गेल्यानंतर कामगार सेना नेमकी कुणाची? यावरून वादाला सुरुवात झाली आहे. तिदमे शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटाने त्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कामगार सेनेची बैठक बोलवत स्वतःला कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून घोषित केलं.

Nashik News
Fire In Mumbai: मुंबईतील साकीनाका येथील गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

त्यानंतर २ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाशिक दौऱ्यावर असतांनाच बडगुजर यांनी महापालिकेतील कामगार सेनेच्या कर्यालयाचा ताबा घेतला. मात्र, याला तिदमे यांनी आक्षेप घेत सरकारवाडा पोलीस ठाण्यात सुधाकर बडगुजर यांच्यासह १५० जणांविरोधात परस्पर संगनमताने कार्यालयाचे कुलूप तोडून ते ताब्यात घेणे, महत्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवज गहाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची फिर्याद दिली.

त्यामुळे नाशकात या दोन्ही गटांमधील वाद आता चिघळत असून मनपातील म्युनिसिपल सेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून शीतयुद्ध सुरू आहे. दोन्ही गटांनी कामगार सेना आणि कामगार सेनेच्या कार्यालयावर आप आपला दावा सांगितला असून आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com