राज ठाकरेंवर शिवसेनेच्या महिला नेत्याची जोरदार टीका, म्हणाल्या...

Manisha Kayande : शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला
Manisha Kayande
Manisha KayandeSaam Tv

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद येथे आज सभा होत आहे. या सभेवरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच राज ठाकरे हे डोंबाऱ्याच्या खेळातील माकड असून या माकडाला नाचवणारे डोंबारी कोण आहे ? हे जनतेला कळून चुकलं आहे. असं म्हणत शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Shivsena Mla Manisha Kayande) यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. औरंगाबादमधील (Aurnagabad) तापडिया नाट्य मंदिरात आज शिवसैनिक प्रशिक्षण शिबीर होत आहे, या शिबिरात त्या बोलत होत्या.

Manisha Kayande
'५ हजार घ्या, चहा नाष्टा करा आणि सभेला या, मनसेच्या सभेला पैसे देऊन गर्दी'

'हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे. असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. काही लोकांना आता काहीच विषय राहिलेला नाही. त्यामुळे ते अस्तित्व दाखवण्यासाठी काहीही करत आहेत, असं अस्तिव शिवसेनेला दाखवण्याची गरज नाही. शिवसेनेचं अस्तित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झालं आहे. आपल्याला अस्तित्व नाही, तर काम दाखवायचं आहे, त्यामुळं भोंगा हा विषय नाही'. असंही मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या की, मुंबईत राणा दाम्पत्याने हनुमान चालीसेचा हट्ट धरला, आता या राणा दाम्पत्याने जेलमध्ये हनुमान चालीसा म्हणावी, यांना जेलमधून सोडवायला देखील आता हनुमानच येणार आहे. असं म्हणत हे सर्व थोतांड असून शिवसेनेला खिजवण्यासाठी हे सर्व काही सुरू असल्याचा आरोप कायंदे यांनी केला आहे.

Manisha Kayande
मनसेची सभा उधळून लावण्यावर भीम आर्मी ठाम, कार्यकर्ते औरंगाबादकडे रवाना

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांना सोंगाड्या म्हणून संबोधलं होतं. दानवे यांच्या वक्तव्याच देखील कायंदे यांनी समर्थन केले. विरोधकांच्या सभेच नाव बूस्टर डोस ठेवलं जातं आहे, आम्हाला बूस्टर डोसची गरज नसून आम्ही लहाणपणीच बाळकडू घेतल्याच सांगत कायंदे यांनी भाजपवर टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com