साताऱ्यात एसटी संपला लागले गालबोट...

कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ मारामारी, वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड...
साताऱ्यात एसटी संपला लागले गालबोट...
साताऱ्यात एसटी संपला लागले गालबोट...ओंकार कदम

सातारा - संपाच्या 9 व्या दिवशी गालबोट लागले आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते.

हे देखील पहा -

यावर इतर संपकरी कर्मचाऱ्यांनी बस का घेऊन गेला? अशी विचारणा केली म्हणून किरकोळ बाचाबाची होऊन यामध्ये मारहाणीची घटना घडली आहे.सातारा आगारातील वाहक राजू पवार याने वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातला आहे. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस दाखल झाले. मारहाण करणाऱ्या वाहकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com