गुन्हेगार पाताळात लपला असला तरी पाेलिस त्यास शाेधतील : राऊत

आम्हांला (राज्य सरकाराला) काेणी शहाणपणा शिकवू नये असा टाेला राऊत यांनी नारायण राणेंना लगावला आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Saam Tv

- सागर गायकवाड

नाशिक : पाेलिसांपासून महत्वाची माहिती लपवणं हा देखील एक गुन्हा ठरु शकताे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पाेलिसांनी सहकार्य केलं पाहिजे असा सूर खासदार संजय राऊत यांच्या येथे झालेल्या पत्रकार परिषदेतील वेगवेगळ्या विधानांवरुन स्पष्ट हाेत आहे.

राऊत (sanjay raut) यांच्या उपस्थित माजी महापाैर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील यांनी शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राऊत बाेलत हाेते. राऊत यांनी राणे प्रकरणावरुन विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले खून प्रकरणात हवा असलेल्या आराेपीची माहिती केंद्रीय नारायण राणे (narayan rane) यांना असल्याचे त्यांनीच पत्रकार परिषदेत नमूद केले. त्यामुळे एखादी महत्वाची बाब लपवून ठेवणं याेग्य नाही. पाेलिसांना सहकार्य करण्याचे काम हे सर्वांचे आहे. दरम्यान राज्यात कायदा व सुव्यवस्था याेग्य पद्धतीने राबवली जात आहे. आम्हांला (राज्य सरकाराला) काेणी शहाणपणा शिकवू नये असा टाेला राऊत यांनी नारायण राणेंना लगावला आहे.

Sanjay Raut
राणेंचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला; आजच्या घडामाेडींवर लक्ष (VDO)

दरम्यान गुन्हेगार पाताळात लपला असेल तर त्यास महाराष्ट्राचे पोलिस त्यास शोधतील. मग ताे काेणताही गुन्हेगार असाे पाेलिस त्यास नक्की शाेधून काढतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com