भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून रोकड लुटली

सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना माळीवाडा येथील पेट्रोल पंपावर घडली आहे.
भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून रोकड लुटली
भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून रोकड लुटलीSaam Tv

औरंगाबाद - जिल्ह्यातील माळीवाडा Malivada येथे भर दिवसा पेट्रोल पंपावर Petrol Pump दरोडा टाकण्यात आला आहे. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना माळीवाडा येथील पेट्रोल पंपावर घडली आहे. सकाळच्या सुमारास पेट्रोल पंपावर पैशांची मोजणी सुरु त्यावेळी ही घटना घडली आहे. मोजणी सुरु असलेली रक्कम दरोडेखोर घेऊन पसार झाले आहेत.

हे देखील पहा -

आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावर कॅश मोजण्याचे काम सुरु होते. त्यावेळी दरोडेखोर हे पेट्रोल पंपावर आले. दोन अज्ञात व्यक्तींनी हा दरोडा टाकला आहे. यावेळी अज्ञात दरोडेखोरांनी मोजणी चालू असलेली रक्कम घेऊन पोबारा केला.पेट्रोल पंपावरील कर्मचारी नेहमी प्रमाणे आपले काम करत होते. यावेळी अचानक दोन अज्ञात व्यक्ती तोंड बांधून ऑफिसमध्ये शिरले आणि त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुक आणि चाकूचा धाक दाखवत हा दरोडा टाकला.

भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून रोकड लुटली
भुसावळात नगरसेवकासह पाच जण हद्दपार; टोळी गँगविरुध्द मोठी कारवाई

भरदिवसा ही घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसाहा दरोडा पडल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com