रेशन दुकानदाराला ठोकल्या बेड्या; ज्यादा दराने करत होता तांदुळ विक्री

घरातील सरकारी कंट्रोलचा तांदुळ अवैधरित्या बाळगून ठेवला होता.
रेशन दुकानदाराला ठोकल्या बेड्या; ज्यादा दराने करत होता तांदुळ विक्री
रेशन दुकानदाराला ठोकल्या बेड्या; ज्यादा दराने करत होता तांदुळ विक्रीअॅड. जयेश गावंडे

अकोला : एकीकडे राज्यात सध्या अनेक जीवनावशअयक गोष्टींचे दर वाढले आहेत शासनाने गोरगरिबांना कमी किमतीमध्ये तांदुळ, गहू असे धाऩ्य दिण्याची योजना रेशनिंगच्या दुकानाद्वारे सुरु केली आहे. मात्र याच शासनाने दिलेल्या धान्याची अवैध्यरित्या आणि चढ्या दराने अनेक ठिकाणी केली जाते असाच एक प्रकार अकोल्यात समोर आला आहे.

हे देखील पहा -

अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या आलेगाव येथे एका सरकारी धान्य विक्रीच्या दुकानात गरिबांना देण्यात येणाऱ्या तांदळाची ज्यादा दराने विक्री करण्यात येत होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून आरोपीला तांदुळ शासणाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा ज्यादा दराने विकताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.

रेशन दुकानदाराला ठोकल्या बेड्या; ज्यादा दराने करत होता तांदुळ विक्री
मावळ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री असल्याचा विसर!

पोलीस स्टेशन चांनी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीपूर्वक बातमी मिळाली की, आलेगावातील एक व्यक्ती आपल्या घरातील सरकारी कंट्रोलचा तांदुळ अवैधरित्या बाळगून ठेवला आहे. तेथे धाड टाकली असता शेख नफान शेख अंनवर वय 38 रा मोमिंनपुरा आलेगाव याने आपल्या घरात अवैध रित्या साठून ठेवलेला सरकारी धान्य आढळून आला. आरोपी शेख नफान शेख अंनवर याच्याकडे जवळपास 32 क्विंटल तांदूळ किंमत 64,000 रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्यानंतर त्याच्या विरोधात पोलिस स्टेशन चांनी येथे EC अॅक्ट अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com