राज ठाकरेंच्या फाेननंतर आजींचे तीन लाखाचे बिल झाले माफ

Raj Thackeray
Raj Thackeray

परभणी : आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने अंध मुलाने आपल्या आईच्या उपचारासाठी पैशांची मदत व्हावी यासाठी तिवठाना येथून थेट मुंबई गाठली. तेथे मुलाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांना सांगताच राज यांनी डाॅक्टरांशी फाेनवर संवाद साधत मदतीची अपेक्षा व्यक्त केली. राज यांच्या आवाहनाने डाॅक्टारांनी तब्बल तीन लाख रुपयांचे बील माफ केले. raj-thackeray-phone-call-to-doctor-helped-one-lac-parbhani-positive-news-sml80

सोनपेठ तालुक्यातील तिवठाना येथील सुशीलाबाई मुरलीधर धोंडगे (वय ६५) यांचा जमिनीवर पडून पाय मोडला होता. त्यांना परभणी येथे परभणी आयसीयु या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. धाेंडगे आजीना काेविडची देखील लागण झाली. सुशीलाबाईला दोन मुले आणी दोन एकर कोरडवाहू जमीन त्यात मोठा मुलगा वेगळा राहतो. धाकटा मुलगा अंध. त्याला ही चार मुली अशा परिस्थितीत अंध मुलगा ज्ञानेश्वर याने आपल्या आईच्या उपचारांसाठी धडपड करुन एक लाख रुपये जमा केले. परंतु रुग्णालयाचे बिल झाले चार लाख. पुन्हा अंध ज्ञानेश्वरची धडपड सुरु झाली.

Raj Thackeray
९ कोटी ५६ लाखांच्या वसूलीत ढिलाई; महावितरणचा अभियंता निलंबित

सर्व मार्ग बंद झाले हाेते. ज्ञानेश्वरने एक मार्ग निवडला. त्याने थेट मुंबई गाठली. ताे कृष्णकुंजवर गेला. जेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे. ज्ञानेश्वरने राज यांची भेट घेतली. त्याने आपली सर्व हकीकत त्यांना सांगितली. राज ठाकरे यांनी त्यास दिलासा दिला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशउपाध्यक्ष बालाजी मुंढे यांना संबंधित रुग्णालयाचे डॉक्टर देशमुख यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यानंतर बालाजी मुंढेनी डाॅ. देशमुख यांच्यापर्यंत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा निराेप पाेहचविला. धोंडगे यांच्या अर्थिक परिस्थितीची कल्पना राज ठाकरेंनी Raj Thackeray डाॅ. देशमुख यांना दिली तसेच मदत करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे आवाहन केले. दाेघांच्या झालेल्या संवादानंतर डाॅ. देशमुख यांनी तीन लाख रुपयांची सवलत धोंडगे यांना दिली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com