रायगड: गरोदर मातांसाठी जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्ष अपुरे; जमिनीवर उपचार घेण्याची वेळ

गरोदर मातांची संख्या जास्त तर बेड कमी
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदर मातांची (Pregnant Women) संख्या दिवसेंदिवस लक्षणीय वाढू लागली आहे. त्यामुळे प्रसूती कक्ष हे अपुरे पडत असल्याने गरोदर माताना खाली जमिनीवर उपचार घेण्याची वेळ आली आहे. प्रसूती कक्ष (Maternity ward) वाढवून त्याठिकाणी बेडची संख्या वाढवावी अशी मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. त्यामुळे गरोदर मातांच्या या समस्येकडे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. (Raigad Local News Updates)

रायगड (Raigad) जिल्ह्यातून हजारो रुग्ण हे आपल्या आजारावरील उपचारासाठी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असतात. त्याचप्रमाणे गरोदर माताही प्रसूतीसाठी येत असतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर प्रसूती आणि नवजात मुलाचे कक्ष आहे. या कक्षात 42 बेडची संख्या आहे. असे असले तरी दररोज 20 ते 22 नवीन रुग्ण हे दाखल होत आहेत. त्यामुळे बेड संख्या कमी आणि गरोदर माता संख्या जास्त होऊ लागली आहे. त्यामुळे त्याचा ताण हा प्रशासनावर पडत आहे. बेड नसल्याने आणि कक्ष अपुरा पडत असल्याने गरोदर मातांना खाली गादी टाकून त्यावर झोपवले जात आहे.

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय
Corona In Delhi: दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये बंद; कडक निर्बंध लागू

खाजगी दवाखान्यात प्रसूती झाल्यावर अवाच्या सव्वा बिल रुग्णाच्या नातेवाईकांकडून आकारले जाते. त्यामुळे खाजगी रुग्णालयाचा खर्च हा सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना दाखल केले जाते. रोज वाढत असलेली गरोदर मातांची संख्या पाहता प्रसूती कक्ष हा अपुरा पडत चाललेला आहे. तर दुसरीकडे या कक्षाच्या बाहेरील भिंतीचे काम सुरू असल्याने आतील भागातील रुग्णांना दुसरीकडे हलविले आहे. याचाही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे प्रसूती कक्ष हा वाढवून त्यातील बेड संख्या वाढविणे अंत्यत गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाने हालचाल करून ही समस्या सोडविण्यासाठी उपययोजना करणे महत्वाचे आहे.

हे देखील पहा-

प्रसूती कक्षात गरोदर मातांची संख्या वाढली आहे.रुग्ण संख्या वाढली असली तरी रुग्णाची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. लवकरच ही समस्या सोडविली जाईल असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com