समीर ज्ञानदेव वानखेडे की समीर दाऊद वानखेडे; साम टीव्ही थेट वानखेडेंच्या गावात

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा जन्म दाखला (Birth Certificate) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समीर ज्ञानदेव वानखेडे की समीर दाऊद वानखेडे; साम टीव्ही थेट वानखेडेंच्या गावात
समीर ज्ञानदेव वानखेडे की समीर दाऊद वानखेडे; साम टीव्ही थेट वानखेडेंच्या गावातSaam TV

वाशिम: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा जन्म दाखला (Birth Certificate) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून वानखेडे प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा असून, या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे. असा इशारा समीर वानखेडे यांनी दिला आहे. समीर वानखेडे यांनी आपल्याबाबत खोटे दस्ताऐवज प्रसिद्ध केले जात आहेत. तुम्हाला खरी माहिती घेण्यासाठी माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. असे वानखेडे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.

समीर ज्ञानदेव वानखेडे यांच मुळं गाव हे वाशिम जिल्ह्यातील वरुड तोफा हे असून, या गावात त्यांची वडिलोपार्जित घर जमीन आहे. सध्या त्यांचे काका शंकरराव कचरूजी वानखेडे हे सेवानिवृत्त असून, सध्या वाशिम शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी जाऊन समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांचे मूळ कागदपत्रे बघितली असता त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जाती चे असल्याचं दिसून आलंय.

आज नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर दाऊद वानखेडे असे ट्विट केल्यानंतर वानखेडे यांनी माझ्या मूळगावी जाऊन तपासा असे सांगितलयांतर समीर वानखेडे यांच्या काका राहत असलेल्या वाशिम येथे येऊन त्यांच्याशी संपर्क साधला असता. माझा भाऊ ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे मुंबई ला लोखंडवाला परिसरात राहत असल्याने त्यांना टोपण नाव दिल असेल, मात्र हे राजकिय आरोप आहेत. माझ्या भावाचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हेच तर पुतण्याचे समीर ज्ञानदेव वानखेडे हेच असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलय.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com