Pimpri Chinchwad News: घृणास्पद! विकृताने म्हशीच्या रेडकासोबत केलं अनैसर्गिक कृत्य

Pimpri Chinchwad Crime News: घृणास्पद! विकृताने म्हशीच्या रेडकासोबत केलं अनैसर्गिक कृत्य
Pimpri Chinchwad Crime News
Pimpri Chinchwad Crime NewsSaam Tv

Pimpri Chinchwad Crime News:

माणुसकीला काळीमा घालणारी एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातून समोर आली आहे. शहरात एका 24 वर्षीय विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने चक्क म्हशीच्या रेडकावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

घटनेची दृश्य देखील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. आरोपीवर चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखिल करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Crime News
CM Shinde in Action Mode : नांदेडच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे अॅक्शन मोडमध्ये; सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी थेट आदेशच काढले

रामकिशन असं आरोपीचे नाव आहे. आरोपीने म्हशीच्या दीड वर्षाच्या रेड्याचे हातपाय बांधून छळ करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.  (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरातील एका सोसायटी मध्ये उत्तर प्रदेश येथून रामकिशन हा नोकरीच्या शोधा पिंपरी चिंचवड शहरात आला होता. त्याच्या घराच्या बाजूलाच एक गाय आणि म्हशींचा गोठा होता. त्या गोठ्यात म्हशीचे दीड वर्षाचे रेडकू होते.

Pimpri Chinchwad Crime News
Nanded Hospital Death: चार दिवसांत शासकीय रुग्णालयात १०० हून अधिक मृत्यू, वडेट्टीवार यांचा आरोप

हा व्यक्ती म्हशीच्या रेडक्याचे हातपाय बांधून त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करत होता. या घटनेनंतर रेड्याचे हातपाय बांधलेले अवस्थेत रेडा दिसून आल्यानंतर गोठा मालकांनी सीसीटीव्ही तपासले असता ही घटना उघडकीस आली आहे. यानंतर आता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com