Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेल पुन्हा वाढणार? पाहा आजचे दर

राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे
Petrol Diese Price
Petrol Diese PriceSaam Tv

मुंबई : इंधनदरवाढीत होपळून निघालेल्या सर्वसामान्यांना केंद्राबरोबरच राज्य सरकारनेही दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारकडून दिलासा मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण झाली. मात्र ही घसरण काही दिवसांपुरतीच मर्यादीत असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात येतंय. बाजार विश्लेषकांनुसार, ग्लोबल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोलियम कंपन्या पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवू शकतात. (Petrol Diesel Prices Today)

Petrol Diese Price
आर्थिक नियोजन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

तज्ञांच्या मते जागतिक बाजारपेठेत पेट्रोल-डिझेलचे भाव 113 डॉलर प्रति बॅरलजवळ पोहोचला आहे. त्यामुळे हा भाव आणखीच वाढत गेला तर, कंपन्यांना पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढवावा लागू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. केंद्राकडून एक्साइज ड्यूटी आणि राज्यांनी वॅटमध्ये कपात केल्यानंतर इंधन दर कमी झाला. परंतु आता पुन्हा पेट्रोलियम कंपन्यांना दर वाढवण्याची संधी मिळू शकते.

दरम्यान, शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली. केंद्राकडून दिलासा मिळाल्यानंतर आता राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. त्यामुळे राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली.

मुंबईत आजचे पेट्रोल-डिझेल दर

केंद्राने एक्साइज ड्यूटी आणि राज्याने वॅटमध्ये कपात केल्यानंतर मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलीटर 109.27 रुपयांवर आले आहे. राज्य सरकारने पेट्रोलवर वॅट 2.08 रुपये लीटर आणि डिझेलवर 1.44 रुपये लीटर कपात केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केलं आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेल दर कमी झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 7.16 रुपये आणि डिझेलचा भाव 7.49 रुपयांनी कमी झाला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com