Pankaja Munde Emotional: गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक, म्हणाल्या, माझ्या घरात...

In Memory of Gopinath Munde: दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक झाल्याचं पाहायला मिळाल्या.
Pankaja Munde News
Pankaja Munde News Saam tv

Beed News : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक झाल्याचं पाहायला मिळाल्या. कुटुंबाला एकत्र ठेवणे हे भाग्य सर्वांच्या नशिबी नसते. माझ्या घरात कोणी मोठा भाऊ आहे का? आम्ही तिघी बहिणीच आहोत, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली. बीडच्या परळी शहरात नटराज रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलतं होत्या. (Latest Marathi News)

पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुढे म्हणाल्या, आज मला बाबांचा चेहरा आपल्यात दिसला बाबा म्हणायचे, की बेटा तुझ्या कार्यकर्त्यांना आता पासूनच टक्कल पडत आहे. मात्र, माझ्या कार्यकर्त्याना भरपूर केस आहेत. आज जर ते असते तर ते म्हणाले असते की, आपलं वय जगाला कळलं असतं म्हणून ते त्यांच्या मित्रांना असा अमृतमहोत्सव साजरा करु दिला नसता, म्हणत आठवणींना उजाळा दिला.

Pankaja Munde News
Sandeep Deshpande News : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

'दिवगंत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) साहेब यांचा अमृत महोत्सव घेता आला नाही. ती संधी अन हे भाग्य आमच्या नशिबी नव्हते म्हणत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आज सुद्धा माझे बाबा नाहीत हे दुःख पचवन मला खूप कठीण जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या मित्रांनाही पचवणं कठीण होतं. पण आपल्या सगळ्याच्या सोबतीमुळे आम्ही एकमेकांना सहारा देत आलो, असे त्या म्हणाल्या.

'अचानकपणे बाबा आम्हाला सोडून गेले अन माझ्या खांद्यावर परिवार संभाळण्याचे खूप मोठं आव्हान होत, माझे खांदे ओझ्याने झुकले होते, पण सर्वांनी वाटून घेतलेल्या जिमेदारी मुळे मी आज मोकळेपणाने काम करत आहे, असेहरी पंकजा मुंडे म्हणल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, एखाद्या माणसाला चांगलं बोलून झालं नाही तरी चालेल, पण एखाद्याविषयी वाईट बोलनं, असं माझ्या कडून होणार नाही. परिवार एकेठिकाणी आसन हे खुप मोठं भाग्य असत अन त्यांना एकवटून ठेवन्याचे भाग्य हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली.

Pankaja Munde News
Pune News : कसब्यात रवींद्र धंगेकरांचा मोठा विजय; 13 वर्षांच्या वनवासानंतर कॉंग्रेस भवनात उधळला गुलाल

'माझ्या घरात आहे का कोणी मोठा भाऊ ? का कोणी आम्हला सांगणारे नाही. आम्ही तीन मुली आहोत असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मनातील खंत व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com