दारू सुटण्याचं औषध पिला आणि मृत्यू पावला; औषध देणारा महाराज फरार

जालन्यात 'रोगापेक्षा ईलाज भयंकर' या म्हणीचा प्रत्यय आला असून, दारूचं व्यसन सोडण्याचं औषध दिल्यानं एका जणाचा मृत्यू झाला आहे.
दारू सुटण्याचं औषध पिला आणि मृत्यू पावला; औषध देणारा महाराज फरार
दारू सुटण्याचं औषध पिला आणि मृत्यू पावला; औषध देणारा महाराज फरारSaamTv

जालना : दारूचं व्यसन सोडण्याचं औषध दिल्यानं एका जणाचा मृत्यू झाला आहे. ४० वर्षीय गोपाल दवांडे असं या औषधाचं सेवन केल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्याच नाव असून तो अकोला जिल्हयातील शिसामासा गावचा रहिवासी आहे. तर, दारूचं व्यसन सोडण्यासाठी औषध देणारा महाराज हा जालन्यातील धावडा गावचा रहिवासी आहे.

हे देखील पहा -

महाराजाने दिलेल्या औषधामुळे मृत्यू झाल्यानं मयताच्या नातेवाईकांनी मयताचा मृतदेह औषध देणाऱ्या महाराजांच्या घराच्या दरवाज्यात आणून ठेवल्यानं महाराज फरार झाला आहे. तडवी बाबा असं फरार झालेल्या महाराजाच नाव आहे. शिसामासा येथील गोपाल दवांडे यांचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी त्यांना काल जालन्यातील धावडा येथील तडवी बाबा या महाराजाकडे आणण्यात आलं होतं. काल या महाराजाने दारु सोडवण्यासाठी साडेचार हजार रुपये घेऊन त्यांना दोन ग्लास औषध पाजलं.

दारू सुटण्याचं औषध पिला आणि मृत्यू पावला; औषध देणारा महाराज फरार
भाजप-राष्ट्रवादी मध्ये जुंपली श्रेयवादाची लढाई, विकास खुंटल्याचा सेनेचा आरोप

त्यानंतर गोपाल दवांडे हे बेशुध्द अवस्थेत होते. मात्र, आज दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. दरम्यान, या महाराजावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी मयताच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेची माहिती पारध पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com