लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यामध्ये मन हेलावणारी घटना घडली
लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या
लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून 23 वर्षीय तरुणाची आत्महत्याSaam Tv

परभणी : परभणी Parbhani जिल्ह्यातील मानवत Manwat तालुक्यामध्ये मन हेलावणारी घटना घडली आहे. या गावात एका युवकाने लग्न होत नसल्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. युवकाने आपल्या राहत्या घरीच साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत. भागवत आसाराम टगुळे असे आत्महत्या केलेल्या २३ वर्षीय युवकाचे नाव आहे. मृत भागवत टगुळे हा मानवत तालुक्यामधील बोंदरवाडी या गावातील रहिवासी आहे. त्याने आपल्या राहत्या घरातीच लाकडी अडूला साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

हे देखील पहा-

हरिभाऊ टगुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भागवत याने मागील ६ महिन्यांपासून आपल्या आई- वडिलांकडे लग्नाकरिता तगादा लावला होता. अनेक स्थळे पाहून देखील त्याचे लग्न जुळत नव्हते. तसेच त्याला मनासारखी मुलगी मिळत नव्हती. यामुळे भागवतला मानसिक तणाव आला होता. नैराश्यात गेलेल्या भागवत याने सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या
Accident: भरधाव वेगातील चारचाकीने रस्त्यावरील नागरिकांना चिरडले (पहा व्हिडिओ)

या घटनेची माहिती मिळताच, मानपत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून, हरिभाऊ टगुळे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आहे. एवढ्या कमी वयात तरुणाने अशाप्रकारे अचानक आयुष्याचा शेवट केल्यामुळे कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com