दोन महिन्यांपासून वेतन नाही; रस्त्यावर मुरमुरे-फुटाणे विकतायत एसटी कर्मचारी!

कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रस्त्यावर लावलं दुकान, नागपूरातील एसटीचे चालक विजय बोंद्रे यांची व्यथा
st strike
st strikeSaam Tv

नागपूर : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र, यामुळं कर्मचाऱ्यांचा पगार थांबलाय. त्यामुळं या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळं कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी काही कर्मचारी छोटे मोठे व्यवसाय करू लागले आहेत. असाच एक कर्मचारी नागपूरात आहे जो मुरमुरे फुटाणे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतोय. विजय बोन्द्रे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.

हे देखील पहा :

विजय हा चालक पदावर कार्यरत आहे. गेल्या 70 पेक्षा अधिक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. त्यामुळं कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय. अशात तो फुटपाथवर मुरमुरे फुटाणे विकण्याचं दुकानं लावतो. यातून त्याला दिवसातून दोन तीनशे रुपये मिळतात. रोज मिळणाऱ्या पैशातून आता त्याची उपासमार थांबलीय.

st strike
क्या चोर बनेगा रे तू? चोराने मोबाईल चोरला खरा; मात्र स्वतःच्या चुकीने लागला पोलिसांच्या हाती!

केवळ विजय बोन्द्रेच नाही तर संपामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीय. बडतर्फ, निलंबित, सेवा समाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा तर आणखीन वाईट आहे. त्यामुळं या संपामुळे अनेकांची घरं उध्वस्त होण्याची वेळ आलीय. मात्र, हा संप लवकर संपून या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांचा संसाराचा गाढा पूर्ववत व्हावा.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com