Nitin Sardesai vs Sanjay Raut
Nitin Sardesai vs Sanjay RautSaam Tv

'संभाजीनगर शिवसेनेचा गढ होता पण..' नितीन सरदेसाईंनी शिवसेनेला डिवचलं

Nitin Sardesai : कुणाचं हिंदुत्व बोगस आणि कुणाचं खरं आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे असं नितीन सरदेसाईंनी म्हटलं आहे

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thakare) यांची रविवारी (१ मे) औरंगाबाद (Aurangabad) येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी ते आज पुण्याहून औरंगाबादकडे (Pune To Aurangabad) रवाना होणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू असून रेकॉर्डब्रेक सभा होईल असा विश्वास मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेला भाडोत्री हिंदुत्वाची गरज नाही अशी टीका मनसेवर केली होती. त्यावर प्रत्युत्तर देतांना संजय राऊत यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

Nitin Sardesai vs Sanjay Raut
Raj Thackeray: राज ठाकरे पुण्यात, वसंत मोरे गैरहजर; साईनाथ बाबर म्हणाले...

मनसेचे हिंदुत्व बोगस आहे, असं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakare) यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना कुणाचं हिंदुत्व बोगस आणि कुणाचं खरं आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत असून हिंदुत्वाचा वसा घेतलेले लोक कसे वागतायत हे महाराष्ट्राला माहीत आहे असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्याआधी आपण कुठे होतो, याच आत्मपरीक्षण करावं असंही नितीन सरदेसाई म्हणाले. औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांचीही सभा होणार असून सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. असं सांगत सरदेसाईंनी यावर बोलण्याचं टाळलं आहे.

दरम्यान, पुढे बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले की, संभाजीनगर हा शिवसेनेचा गड होता पण, आता नाही अशी टीकाही त्यांनी केली. राज ठाकरे औरंगाबादमध्ये 4 वाजेपर्यंत पोहचतील असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल नागपूरात बोलताना काही लोकं महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करत आहे याची नोंद जनतेने घेतली पाहिजे. चुकीचे सल्ले महाराष्ट्रात चालू देणार नाही असं म्हटलं होतं. यावर बोलताना नितीन सरदेसाईंन अजित पवारांना टोला लगावला आहे. अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षातील नेते चुकीचं बोलतायत ते आधी त्यांनी बघावं, नंतर आम्हाला उपदेश करावा. असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com