Swine Flu in Maharashtra : स्वाईन फ्लूचा महाराष्ट्रात शिरकाव, मालेगावमध्ये दोघांचा मृत्यू; नागरिकांमध्ये घबराट

Nashik Swine Flu : स्वाईन फ्लूने माजी कृषी अधिकारी व एका महिलेचा मृत्यू झालाय. यामुळे मालेगाव महापालिका प्रशासनाचे आरोग्य विभाग पुन्हा एकदा अर्लट मोडवर आले आहे.
Swine Flu
Swine FluSaam TV

अजय सोनवणे, मनमाड(नाशिक)

नाशिकच्या मालेगाव शहरात स्वाईन फ्लूचा पुन्हा एकदा शिरकाव झाला आहे. स्वाईन फ्लूची लागण होऊन दोघांचा मृत्यू झालाय. सदर घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Swine Flu
Nashik Chhagan Bhujbal News: नाशिकमधून छगन भुजबळ यांची मोठी राजकीय खेळी! महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरुन रस्सीखेच कायम?

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, स्वाईन फ्लूने माजी कृषी अधिकारी व एका महिलेचा मृत्यू झालाय. यामुळे मालेगाव महापालिका प्रशासनाचे आरोग्य विभाग पुन्हा एकदा अर्लट मोडवर आले आहे. मृत्यू झालेल्या कुटूंबातील व्यक्तींचा तसेच परिसरातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

कोणालाही सर्दी,ताप,खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री आहेर यांनी केले आहे. साधी लक्षणे असल्याने आपल्याला स्वाईन फ्लू झाला आहे की नाही हे पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे साधा सर्दी, खोकला असला तरी देखील उपचार घ्यावेत, असं महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

मुंबईमध्ये थंडी-तापाची साथ

मुंबईमध्ये देखील स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत काही ठिकाणी नागरिकांना सर्दी, खोकला आणि तापाची साथ आलीये. उपचार घेऊनही काही व्यक्तींची तब्येत अद्याप हवी तशी सुधारलेली नाहीये. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

अशी घ्या काळजी

शक्यतो बाहेरचे खाणे टाळा. तुम्हाला सर्दी, खोकला असा त्रास होत असेल तर त्यावर लगेचच उपचार घ्या. पाणी उकळून थंड करून प्या. दिवसातून एकदा तरी स्टीम घ्या. साधी दुखणी अंगावर काढू नका.

Swine Flu
Jalna Crime News : महिलांच्या शरीराला झाडूने स्पर्श करून उपचार; जालन्यातील भोंदू बाबाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com