Advay Hire Join Thackeray Group: नाशिकमध्ये भाजपाला दे धक्का; अद्वय हिरे उद्धव ठाकरेंच्या गोटात दाखल

नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील भाजपचे नेते डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत थेट ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
Advay Hire Joined Thackeray Group
Advay Hire Joined Thackeray Group

Nashik News: शिवसेना पक्षात दोन गट पडले असतानाच दोन्हीकडेही जोरदार इनकमिंग जोरात सुरू आहे. यामध्ये शिंदे गट आणि भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होताना दिसत होते. मात्र आता ठाकरे गटानेही थेट भाजपाला धक्का दिला असून नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील भाजपचे नेते डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत थेट ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थित अद्वय हिरे यांनी शिवबंधन बांधले. दादरमधील शिवसेना भवनामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. (Latest Marathi News)

Advay Hire Joined Thackeray Group
Food Poisoning: सांगली शहरातील वानलेसवाडी हायस्कूलमधील 32 मुलांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकचे अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांच्यासह अद्वय हिरे यांनीही भाजपा तसेच शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"आतापर्यंत शिवसेनेमुळं अद्वय हिरे विधानसभेत पोहचू शकले नाहीत,आता ते सेनेमुळेच विधानसभेत पोहचतील, असे म्हणत बाजारबुनगे गेल्यामुळे सेनेला फरक पडणार नसून भविष्य सेनेचे आहे," अशा शब्दात राऊतांनी (Sanjay Raut) हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर "तुमच्यामुळे शिवसेनेला तरुण नेतृत्व मिळाले, तुमचा सन्मान कायम राहील," असे आश्वासनही त्यांनी हिरे यांना दिले आहे.

Advay Hire Joined Thackeray Group
Solapur Accident : आजाेबांच्या डाेळ्यांदेखत नातवाचा ट्रकच्या चाकाखाली मृत्यू; आठवड्यातील दुसरी घटना

अद्वत हिरे यांनीही चढवला हल्लाबोल...

ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे यांनीही शिंदे गट तसेच भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "५० गद्दार भाजपच्या मांडीवर बसल्याने आमची त्यांना गरज उरली नाही. जो शेतक-याला वाचवू शकत नाही,त्यांच्यासोबत मी राहणार नाही," अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

त्याचबरोबर "काल प्रदेशांध्यक्षांपासून अनेकांचे फोन आहे. शेवटी मला फोन स्विच ऑफ करावा लागला कितीही खोके दिले तरी परत नाही जाणार नाही असे म्हणत पैशासाठी बाप बदलणारी अवलाद आमची नाही. तु्म्हाला मुख्यमंत्रीपदी बसवल्याशिवाय नाही," असेही अद्वय हिरे यावेळी म्हणाले.

कोण आहेत अद्वय हिरे..?

भाजपाला सोडचिट्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करणारे अद्वय हिरे हे नाशिक (Nashik ) जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन आहेत. नाशिक जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचं युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. मालेगाव तालुका व परिसरातील स्थानिक राजकारणात त्यांचा मोठा दरारा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com