Nashik Lok Sabha : ठाकरे गटातच बंडखोरी? महायुतीत ठिणग्या; नाशिकचं राजकारण ढवळलं!

Nashik Lok Sabha Election News : नाशिक लोकसभा मतदारसंघातून वाजे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याने बंडखोरीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha Saam tv

Nashik Lok Sabha Election :

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने आज बुधवारी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. खासदार संजय राऊत यांनी 'एक्स' सोशल मीडियावर ठाकरे गटाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीत नाशिकमधून राजा वाजे यांना उमेदवारी मिळाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून वाजे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याने बंडखोरीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांचं नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापल्यानंतर ते नाराज झाले आहेत. मी लढणार आणि नडणार, असा इशारा विजय करंजकर यांनी दिला. तसेच कंरजकर यांनी बंडखोरीचेही संकेत दिले आहेत. नाशिकमधून राजा वाजे यांना उमेदवारी दिल्याने विजय करंजकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या २ दिवसांत उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं करंकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Nashik Lok Sabha
Arvind Kejriwal: केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवू शकत नाहीत, नायब राज्यपालांनी स्पष्ट दिला नकार

नाशिकमधून राजा वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय करंजकर यांनी सांगितलं की,'मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लढण्यास सांगितलं होतं. पक्षात घातकी निर्णय घेतले जात आहेत, हे पक्षासाठी चांगले नाही. विजय करंजकर बंडखोरीच्या तयारीत असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे'. गेल्या दोन टर्ममध्ये विजय करंजकर यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चांनी शिंदे गटात अस्वस्थता

दुसरीकडे, नाशिक लोकसभा मतदारसंघातील भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. हेमंत गोडसेंना डावलून छगन भुजबळांना उमेदवारी देण्याच्या चर्चेने शिंदे गटात नाराजी पसरली आहे. या नाराजीनंतर शिंदे गटाने तातडीची बैठक बोलावली.

Nashik Lok Sabha
Prakash Ambedkar : 'वंचित' लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार; प्रकाश आंबेडकर अकोल्यातून रिंगणात, ९ उमेदवार जाहीर

शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीत नाशिकची जागा राष्ट्रवादीला देऊ नये, बैठकीत सूर उमटत आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आपल्याला एक जागा मिळावी, अशी शिंदे गटाचे नेते करत आहेत. यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर ही बैठक झाल्यानंतर हे सगळे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com