पालकांनो सावधान! ८ महिन्यांच्या बाळाने गिळलं नेलकटर; नाशकातील धक्कादायक घटना

नाशिकरोड परिसरातील के जी मेहता येथील एका आठ महिन्यांच्या बाळाने पालकांचं लक्ष नसताना नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nashik News
Nashik Newsअभिजित सोनावने

नाशिक: लहान मुलांना सांभाळण किती कठीण काम असतं हे पालकांना चांगलचं माहिती आहे. लहान मुलांना आपण काय खातोय, कशाला हात लावतोय हे काही कळतं नाही. त्यामुळे १ ते २ वर्षापर्यंत मुलांना खूप जपावं लागतं. मात्र, अशातही जर पालकांचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तर ते किती धोक्याचं ठरु शकतं याचं एक उदाहरण नाशिकमधून (Nashik) समोर आलं आहे.

नाशिकरोड परिसरातील के जी मेहता येथील एका आठ महिन्याच्या बाळाने पालकांचं लक्ष नसताना नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. लहान मुलाने नेलकटर गिळल्याचं कळताच घरातील लोक चांगलेच घाबरले होते.

पाहा व्हिडीओ -

शिवाय जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) उपचार शक्य नसल्याने मेडिकल कॉलेजमध्ये या लहान बाळाला घेऊन गेले. यावेळी डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे ऑपरेशन (Operation) करत नेलकटर घशातून बाहेर काढल्यावर पालकांचा जीव भांड्यात पडला.

डॉक्टरांनी केलेल्या एक तासाच्या प्रयनानंतर या बाळाला कोणतीही शारीरिक इजा ना होता नेलकटर बाहेर काढल्यामुळे बाळाच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले. तसंच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असं आवाहन देखील पालकांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com