Nandurbar: मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांच्‍या टोळीचा हल्‍ला; ११ मेंढ्या फस्त

मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांच्‍या टोळीचा हल्‍ला; ११ मेंढ्या फस्त
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथे शेत शिवारात मध्यरात्री मेंढ्यांच्या कळपावर ४ ते ५ लांडग्यांच्या टोळीने हल्ला करून तब्बल ११ मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. या हल्ल्यात मेंढपाळाचे नुकसान झाले असून घटनेचा वन विभागाच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. (Nandurbar News Wolf Attack)

Nandurbar News
Soybean Crop: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवसंकट; पिवळा मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव

रजाळे येथील (Nandurbar News) डेमा ठेलारी यांच्या मेंढ्यांचा कळपा आपल्या शेतातच असल्याने रात्री १ वाजेच्या सुमारास अचानक चार ते पाच लांडग्यांनी मेंढ्यांवर हल्ला चढविला. यात दहा मेंढ्या व एक कोकरू अशी ११ जनावरे फस्त केली आहेत. यामुळे ठेलारी कुटुंबियांमध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात कोणीही नसल्याने कुटुंबियांवर घबराट निर्माण झाली होती. सुदैवाने लांडग्याच्या हल्यात ते बचावले आहेत.

दीड लाखाचे नुकसान

मेंढ्यांच्या कळपामध्ये १५० ते २०० मेंढ्या होत्या. यात ११ मेंढ्या लांडग्यांनी ठार केले आहे. यामुळे डेमा ठेलारी यांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी वनविभागाचे कर्मचारी तांबोळी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नाना पाटील, सावळीराम करिया, सिदा होडगर, डेमा ठेलारी आदी पंचनामा करतेवेळी उपस्थित होते. सदर घटनेमुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com