शहादा बंद; बाजार समिती व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मोफत जेवण

शहादा बंद; बाजार समिती व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मोफत जेवण
Shahada News
Shahada NewsSaam tv

नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा शहरात रामनवमीच्या मिरवणुकीत पोलिसांनी बँड जप्त केल्यामुळे आज हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. या बंदचा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनाही (Farmer) बसला आहे. बाजार समितीत आलेल्‍या शेतकऱ्यांना बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून मोफत जेवणाची व्‍यवस्‍था केली. (nandurbar Shahada closed Free meals to farmers from market committee traders)

Shahada News
हृदयद्रावक..मजूरीला गेलेल्‍या आईला दिसली फक्‍त मुलाची राख; झोपडीला अचानक आग

शहादा (Shahada) तालुक्यातील खेड्यापाड्यातुन आलेल्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी वर्गाने बळीराजासाठी मोफत जेवणाची सोय करून दिली आहे. सोबत सामाजिक कार्यकर्ते डि. के. अग्रवाल यांनी थंडपेय व मसाले ताक वाटप करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळली आहे. शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनीही (Police) मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या बळीराजाचे व्यापारी वर्गाने जेवणाची सोय केल्याने कुतूहल व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी व्यापारी असोसिएशन शहादा पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव व कर्मचारी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com