Crime News: दारूच्या नशेत पत्नीचा गळा आवळून केला खून

दारूच्या नशेत पत्नीचा गळा आवळून केला खून
Nandurbar Navapur Crime News
Nandurbar Navapur Crime NewsSaam tv

नवापूर (नंदुरबार) : देवमोगरा येथे घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून (Crime) केल्याची धक्कादायक घटना घडली. टीना अविनाश पाडवी (३३) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयित आरोपी अविनाश पाडवी (४०, रा. देवमोगरा ता. नवापूर ) यास विसरवाडी (Police) पोलिसांनी अटक केली आहे. (Nandurbar Navapur Crime News)

Nandurbar Navapur Crime News
Cyber Crime: इन्स्टाग्रामवर बनावट खाते करून तरुणीची बदनामी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी संशयित (Navapur) अविनाश पाडवी याने दारूच्या नशेत पत्नीसोबत घरगुती भांडणावरून गळा आवळून तिच्या पाठिवर, चेहऱ्यावर, दोन्ही पायांवर मारहाण करून जिवे ठार (Crime News) केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक भूषण बैसाणे, सहाय्यक उपनिरीक्षक नरेंद्र वळवी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारींनी फॉरेन्सिक वैद्यकीय तपासणी तसेच विच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठविला. घटनेप्रकरणी गुलाबसिंग वसावा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत अविनाश जेना पाडवी यास ताब्यात घेतले. उपनिरीक्षक भूषण बैसाणे तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com