Cyber Crime: तुम्हाला आलाय का हा मेसेज तर मग व्हा सावध! ‘व्हॉट्सॲप’वरून फसवणुकीचा प्रयत्न

तुम्हाला आलाय का हा मेसेज तर मग व्हा सावध! ‘व्हॉट्सॲप’वरून फसवणुकीचा प्रयत्न
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात काही दिवसांपासून नागरिकांच्या व्हाट्सअप (Whats app) नंबरवर बनावट फेक मेसेज फॉरवर्ड होत आहे. त्या मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे, की मागील महिन्याचे बिल भरलेले नसल्याने तातडीने वीजबिल भरा अन्यथा तुमचे वीज कनेक्शन महावितरणच्ये (Mahavitaran) कर्मचारी घरी येऊन रात्री 9:30 वाजेला वीज खंडित करतील. तसेच वीजबिल भरण्याबाबत मेसेज मध्ये एक क्रमांक पाठवून त्यावर त्वरित फोन करण्याचे सांगण्यात येत आहे. (Tajya Batmya)

Nandurbar News
Akola Crime News: मुलावर अनैसर्गिक अत्याचार; बोरं देण्याचे आमिष दाखवत 57 वर्षीय नराधमाचे कृत्‍य

सध्या महावितरणतर्फे थकबाकीदार ग्राहकांवर वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई मोहिम जोराने सुरू आहे. याचा फायदा आता काही फसवणूक करणारी टोळी घेत आहेत. नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे मेसेज पाठवून नागरिकांना तातडीने विज बिल भरण्याचे सांगत दिलेल्या क्रमांकावर फोन करण्याचे सांगून नागरिकांना ग्राहक क्रमांक विचारले जाते. यानंतर एटीएम नंबर विचारून त्यांचे फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहे.

महावितरणकडून आवाहन

व्हॉटस्‌ॲप किंवा टेक्‍स मॅसेज करून वीज बिल भरण्याचे सांगितले जात आहे. या फेक मॅसेजमधून अनेकांची फसवणूक झाली आहे. मात्र ग्राहकांना अशा प्रकारचे कुठलेही मेसेज महावितरणतर्फे पाठवण्यात येत नसून ग्राहकांनी या फेक मॅसेजला बळी न पडण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com