Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Nandurbar: निंबाच्या झाडात साकारलेल्या हनुमान मंदिराजवळ चालीसा पठन

निंबाच्या झाडात साकारलेल्या हनुमान मंदिराजवळ चालीसा पठन

नंदुरबार : नंदुरबार मनसे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांसदर्भात दिलेला अल्टिमेटम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नंदुरबार शहरातील धुळे (Dhule) नाका परिसरातील निंबाच्या झाडात साकारलेल्या हनुमान मंदिर जवळ हनुमान चालीसाचे पठाण केले. सदर परिसर अवलगाजी दर्गा जवळ आहे. (Nandurbar news Chalisa recitation near Hanuman temple in neem tree)

आता स्‍वाक्षरी मोहिम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परिपत्रकानुसार यापुढे स्वाक्षरी मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती मनसे (MNS) जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे. आज धुळे नाका परिसरातील निंबाच्या झाडात साकारलेल्या हनुमान मंदिर परिसरात हनुमान चालीसा पठण करताना मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पोलिसांनी ही मोठा बंदोबस्त लावला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com