Nandurbar News: धावत्या बसचा ब्रेक फेल; चालकाने प्रसंगावधान राखत १२ किमीपर्यंत चालवली विना ब्रेक गाडी

धावत्या बसचा ब्रेक फेल; चालकाने प्रसंगावधान राखत १२ किमीपर्यंत चालवली विना ब्रेक गाडी
MSRTC Bus
MSRTC BusSaam tv

नंदुरबार : मतदान यंत्र पोहोचवण्यासाठी आरक्षित असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या (St Bus) अचानक अँगल तुटल्याने प्रेशर पाईप फुटला. यामुळे गाडीचा ब्रेक निकामी झाल्याची घटना आज सकाळी घडली. चालकाने प्रसंगावधान राखत न्याहली ते चौपाळे फाटा अशा १२ किलोमीटरपर्यंत बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित थांबवल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. (Tajya Batmya)

MSRTC Bus
Beed News: धक्कादायक..सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोरील बटन स्टिकफास्टने केले बंद; मतदान रोखण्याचा अजब फंडा

नंदुरबार (Nandurbar) आगाराची एसटी बस रजाळे तलवाडे बु, आसाणे येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन रविवारी सायंकाळी मतदान झाल्यानंतर नंदुरबार येथे पोचवण्यासाठी आरक्षित केली होती. सकाळी बसला धुळे येथे फेरीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर (Dhule) धुळे येथून नंदुरबारकडे येत असतांना न्याहली गावाजवळ चालक दिशेच्या जवळील गाडीचा अँगल तुटून प्रेशर पाईप फुटला. त्यामुळे ब्रेक निकामी झाला.

चालकाने दाखविले प्रसंगावधान

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बस चालक भाऊसाहेब बागुल भांबावून गेले होते. परंतु, परिस्थितीशी तोंड देत त्यांनी प्रसंगावधान राखत न्याहली येथून बसचा गिअरवर नियंत्रण ठेवत चोपाळे फाट्यापर्यंत आणली. तिथून जवळच असलेल्या के. आर. पब्लिक स्कूल जवळील परिसरात गाडी थांबवली.

अन्‌ प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्‍वास

बस चालक भाऊसाहेब बागुल यांनी अत्यंत चलाखीने परिस्थिती आताळली. आलेल्या परिस्थितीशी सामना करत त्यांनी अत्यंत बुद्धी कौशल्य लढवत न्हाहली ते चोपाळे फाट्यापर्यंत बस गियर मध्ये टाकून रस्त्याच्या कडेला थांबवली. गाडी थांबल्यानंतर वाहनचालक भाऊसाहेब बागुल,वाहक करुणा विक्रम पाटील यांच्यासह बस मधील सर्व प्रवाशांनी सुटकेच्या निश्वास सोडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com