Nana Patole on Prakash Ambedkar : आम्ही दोस्तीचा हात पुढे केलाय; नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना पुन्हा ऑफर

Nana Patole on prakash ambedkar news : प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्यासाठी विनंती केली जात आहे. आम्ही दोस्तीचा हात पुढे केलाय, काँग्रेस दोन जागा देण्यास तयार, अशी ऑफर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिली आहे.
Nana Patole
Nana Patole Saam tv

Nana Patole News :

राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी ही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यास अयशस्वी ठरले आहेत. वंचितकडून अकोल्यात प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तरीही दुसरीकडे काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सामील होण्याची विनंती केली जात आहे. 'आम्ही दोस्तीचा हात पुढे केलाय, काँग्रेस दोन जागा देण्यास तयार, अशी ऑफर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भात माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांवर मोठं वक्तव्य केलं. 'काल अकोल्यात जाऊन बाळासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा विनंती केली. आम्ही दोस्तीचा हात हात पुढे केला आङे. काँग्रेस दोन जागा देण्यास तयार आहे. आमचा प्रस्ताव ते मान्य करतील, अशी आमची आशा आहे. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे. त्यांचा प्रस्ताव अजून आलेला नाही, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

Nana Patole
Jalgaon Lok Sabha: जळगावमध्ये भाजप उमेदवार बदलाच्या चर्चांचं वृत्त महाजनांनी फेटाळलं!

महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेवरील तिढ्याबाबत नाना पटोले म्हणाले, 'सांगलीचा विषय हायकमांडकडे पाठवला आहे. आघाडी असताना शिवसेनेने असा एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. विशाल पाटील यांच्या पुनर्वसनाचा हा प्रश्न नाही. सांगलीची जागा ही काँग्रेसचीच आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी फायनल झाली होती. हा तिढा लवकरच सुटेल, असेही नाना पटोले म्हणाले.

Nana Patole
Sangli Lok Sabha News: मविआचं सांगलीत काय होणार? ठाकरे गट लढण्यावर ठाम, काँग्रेसचीही मोठी प्रतिक्रिया समोर

विदर्भात काँग्रेस जिंकणार - नाना पटोले

विदर्भाच्या निवडणुकीविषयी बोलताना पटोले म्हणाले, 'विदर्भात पहिल्या टप्प्यातील सर्व पाचही जागा काँग्रेस जिंकणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अकोल्यासह बहुतांश जागा आघाडी जिंकेल, अशी परिस्थिती आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com