Nagpur: कॉलेजच्या बिल्डिंगवरून उडी मारून 'बीसीए'च्या विद्यार्थ्यानं संपवली जीवनयात्रा

शिवम कटरे (वय १९) असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे.
Nagpur Collage Boy
Nagpur Collage BoySaam TV

नागपूर: नागपुरात (Nagpur) हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका विद्यार्थ्यानं कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. शिवम कटरे (वय १९) असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. शिवम हा एसएफएस कॉलेजमध्ये बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम कटरे हा अवघ्या १९ वर्षांचा तरूण एसएफएस कॉलेजमध्ये बीसीएच्या (BCA) दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्यानं कॉलेज सुरू असतानाच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटना घडल्यानंतर कॉलेजमधील (Collage) विद्यार्थ्यांनी आवारात गर्दी केली.

पाह व्हिडीओ -

शिवमनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं ? असा प्रश्न त्याच्यासोबतच्या विद्यार्थ्यांसह कॉलेजमधील प्राध्यापकांनाही पडला होता. शिवमच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र, तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. याच कारणामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस (Police) करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com