Nagpur 40 years old man dead body found in kalamna police station area nagpur, Nagpur Crime News In Marathi, Nagpur latest news
Nagpur 40 years old man dead body found in kalamna police station area nagpur, Nagpur Crime News In Marathi, Nagpur latest newsSaam tv

नागपूर हादरलं! इसमाची विचित्र पद्धतीने हत्या; नंतर नाल्यात फेकला मृतदेह

Nagpur Crime News : नागपूरमध्येच विचित्र पद्धतीने हत्या करून मृतदेह फेकण्याची घटना घडली आहे.

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरमध्ये हत्यासत्र सुरूच आहे. वारंवार होणाऱ्या हत्येच्या गुन्ह्यानं नागपूर (Nagpur ) हादरलं आहे. हत्येचे सत्र सुरू असताना आणखी एका नव्या हत्येची माहिती समोर आली आहे. नागपूरमध्येच विचित्र पद्धतीने हत्या (Murder ) करून मृतदेह फेकण्याची घटना धक्कादायक घडली आहे. कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरातील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गोपाल लगोटे असे मृत इसमाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. (Nagpur Crime News In Marathi )

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर परिसरात एकाची विचित्र पद्धतीने हत्या करून मृतदेह फेकण्याची घटना घडली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कामठी रोडकडे जाणाऱ्या शेताजवळील कोरड्या नाल्यात मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा मृतदेहाच्या गुप्तांगाला दोरी बांधल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात मृतदेहाविषयी चौकशी केली. मात्र, मृतदेहाची ओळख पटली नाही.

Nagpur 40 years old man dead body found in kalamna police station area nagpur, Nagpur Crime News In Marathi, Nagpur latest news
मैत्रीणच बनली वैरी! सोशल मीडियावर शेअर केले अश्लील व्हिडीओ

दरम्यान, काही वेळानंतर पोलिसांच्या प्रयत्नाला यश आलं. रात्री उशिरा पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. गोपाल लगोटे असे मृत इसमाचे नाव आहे. गुप्तांगाला दोरी बांधून मृतदेह आढळल्याने हत्या कशामुळं केली याचा पोलीस कसून शोध घेत आहे. सदर हत्येचा प्रकार अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नेमकी हत्या का व कोणी केली हे पोलिसांच्या अंतिम तपासानंतरच स्पष्ट होईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com