धक्कादायक! अनैतिक संबधातुन प्रियकरानेच केली प्रियसीची हत्या

अनैतिक संबधातुन प्रियकरानेच केली प्रियसीची हत्या, चन्नेवाडा येथील मृत महिलेच्या हत्येचे खुनाचे रहस्य उलगडले आहे.
धक्कादायक! अनैतिक संबधातुन प्रियकरानेच केली प्रियसीची हत्या
धक्कादायक! अनैतिक संबधातुन प्रियकरानेच केली प्रियसीची हत्याअभिजीत घोरमारे

अनैतिक संबधातुन प्रियकरानेच केली प्रियसीची हत्या, चन्नेवाडा येथील मृत महिलेच्या हत्येचे खुनाचे रहस्य उलगडले आहे.Murder by boyfriend due to immoral relationship भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील चन्नेवाडा जंगल शिवारातील कृत्रिम तलावात मिळालेल्या अज्ञात महिलेच्या प्रेताचे रहस्य उलगडण्यात पवनी पोलिसांना यश आले आहे. आरोपीला आपले संबधीत महिलेशी असणारे अनैतिक संबध उघड होण्याची भीती वाटल्यामुळे प्रियकरानेच त्याच्या प्रियसीची हत्या केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. यातील आरोपी ओम प्रकाश खोब्रागडे वय 45 याला अटक करण्यात आली आहे. तसेच चित्रासेन बीसेना वय 35 वर्षे असे मृतक महिलेचे नाव आहे.

ओमप्रकाश खोब्रागडे हा मौजे चन्नेवाडा येथील रहिवासी असून कामाच्या शोधात नागपूरला जाऊन ठेकेदारीचा व्यवसाय करीत होता. त्याची ओळख मध्य प्रदेशातील चिखली येथील रहिवासी चित्रासेन बीसेना याच्या सोबत झाली. पुढे या दोघांमध्ये जास्त ओळख झाल्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले नंतर एकमेकांचे अनैतिक संबंधही सुरु झाले.

दरम्यान ओमप्रकाशला आपले लग्न झाले असून कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीती आरोपीच्या मनात निर्माण झाल्याने त्याने चित्रासेन बिसेनाची हत्या करण्याचे ठरवले यासाठी त्याने प्रियसी चित्रासेन हिला फिरण्याच्या हेतूने चन्नेवाडा येथे आणून तिला जंगलात निर्जनस्थळी तलावाजवळ घेऊन गेला.

आरोपीने प्रियसिच्या डोक्यात बांबूचा दांड्याने डोक्यामध्ये मारहान केली. नंतर तिच्याशी ढटापट झाल्यानंतर खाली पाडून तिचा गळा आवळून हत्या करण्याचे क्रुर वर्तन तर या आरोपीने केलेच शिवाय पुरावा नष्ठ करण्यासाठी प्रेताला दगड बांधून तलावात फेकले.

धक्कादायक! अनैतिक संबधातुन प्रियकरानेच केली प्रियसीची हत्या
दुबईतून ऑनलाईन सुपारी; मित्राच्या मदतीने पत्नीची हत्या!

मात्र तीन दिवसानंतर वनविभागाचे बिटरक्षक यांना तलावात प्रेत पाण्यावर तरंगताना आढ़ळल्या मुळे संबधित घटना उघड़ झाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पवनी पोलिसांनी आरोपिला अटक केली असुन पोलिसांनी भादंविच्या 302, 201 कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली.सदर प्रकरणातील आरोपिला न्यायालयाने 31 जुलै पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com