दरड कोसळल्याने माथेरानला अडकलेल्या मुंबईकर पर्यटकांची सुटका

माथेरानला अडकलेले मुंबईकर पर्यटक.
माथेरानला अडकलेले मुंबईकर पर्यटक.

नवी मुंबई ः थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानच्या घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळतात. परिणामी बऱ्याचदा येथील वाहतूक ठप्प होते. रविवारची सुट्टी गाठून पर्यटनासाठी आलेले पर्यटक घरी परतत असताना दगड कोसळली. ही घटना अनपेक्षितपणे घडल्यामुळे प्रवासी अडकून पडले.

पर्यटक प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षतेसाठी येथील स्थानिक टॅक्सी संघटना तसेच नेरळ पोलिसांकडून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. यामुळे तात्पुरत्या स्वरूपात वाहतूकीसाठी रस्ता मोकळा करून देण्यात आल्यामुळे पर्यटकांनादेखील मोठा दिलासा मिळाला होता.

माथेरानला अडकलेले मुंबईकर पर्यटक.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार?

दरड कोसळण्याअगोदर अंबरनाथ येथून आलेले चारजण डोंगरात पर्यटन करीत होते. मात्र, त्याचवेळी दगड कोसळली. त्यामुळे त्यांच्या परतीचा मार्ग बंद झाला. माघारी कसे यायचे हेच त्यांना उमगेना. मदतीसाठी त्यांनी आरडाओरड सुरू केली. काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ते त्यांच्या मदतीला धावले.

पेब किल्ला व कड्यावरील गणपती या ठिकाणी वर्षा सहलीसाठी हे चार तरुण गेले होते. दरड कोसळल्याने संपूर्ण नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा रेल्वे ट्रॅक दगड-मातीच्या ढिगाखाली दबला गेला. दरड कोसळल्याने त्या रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. तेथून बाहेर कसे पडायचे यासाठी त्यांना मार्गच दिसेना. या दरड क्षेत्रातून मार्ग काढत या चौघांनाही सुखरूप बाहेर काढले.

पोलिस-पत्रकारांनी वाचवले

आम्ही गणपतीला गेलो तेव्हा वातावरण चांगलं होतं. परंतु माघारी परतताना आम्हाला डोंगर कोसळलेला दिसला. त्यामुळे घाबरलो होतो. आमच्या मदतीला पोलिस आणि पत्रकार आले. काही स्थानिकही होते. त्यांनी मदत केल्यानेच आम्ही सुखरूप बाहेर आलो.

- आबदल खान, पर्यटक, मुंबई

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com