धनंजय मुंडेंना खासदार प्रीतम मुंडेंचे प्रतिउत्तर

सामाजिक न्याय मंत्र्याने आपल्या खात्याचे प्रश्न आधी सोडवावे मग बीडच्या रेल्वे कडे लक्ष द्यावे - खासदार प्रीतम मुंडे
धनंजय मुंडेंना खासदार प्रीतम मुंडेंचे प्रतिउत्तर
धनंजय मुंडेंना खासदार प्रीतम मुंडेंचे प्रतिउत्तरSaam Tv

बीड - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी, अंबाजोगाईत आयोजित कार्यक्रमातून, रेल्वेच्या मुद्द्यावरून मुंडे भगिनीवर टीका करत टोला लगावला होता. तर सामाजिक न्याय मंत्र्याने आपल्या खात्याचे प्रश्न आधी सोडवावेत, मग बीडच्या रेल्वेकडे लक्ष द्यावं असं म्हणत भाजप खासदार पितम मुंडे यांनी प्रत्युत्तर देत, भाऊ धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. परळी शहरात बार्टीच्या विद्यार्थ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या सुरू असलेल्या उपोषनाला खासदार प्रीतम मुंडे यांनी भेट देत त्यांची विचारपूस केली आहे. यादरम्यान त्यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.

हे देखील पहा -

तर या बार्टीच्या विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी, काल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उपोषण कर्त्यां विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावर विद्यार्थ्यांनी आमचं काहीएक ऐकलं नाही. असा आरोप केला होता. यावर खा. प्रीतम मुंडे म्हणाल्या की, "सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा मंत्री धनंजय मुंडे यांचा असून ते या खात्याचे मंत्री आहेत. आणि जर हा प्रश्न धनंजय मुंडे सोडवू शकत नसतील तर आम्ही हा प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लावू. मात्र धनंजय मुंडे यांनी आपल्या खात्याची प्रश्न सोडवण्या ऐवजी बीड रेल्वेच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ नये असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. जर विद्यार्थ्यांना साधा वेळ पण देऊ शकत नसू तर यापेक्षा आणखी दुर्दैव काय असणार ? अशी बोचरी टीका देखील प्रीतम मुंडे यांनी केली.

धनंजय मुंडेंना खासदार प्रीतम मुंडेंचे प्रतिउत्तर
ठाकरे सरकार विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर ठाम, सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष तीव्र होणार

दरम्यान, धनंजय मुंडें याच्याकडे 4 खाते असते तर आम्ही समजू शकलो असतो. मात्र त्यांच्याकडे फक्त एकच खाते आहे आणि साधं त्यांना त्यांच्या खात्याचे प्रश्न सोडवणं होत नसेल, तर यापेक्षा आणखी शोकांतिका काय असणार ? असा टोला देखील बहीण प्रीतम मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडेंना लगावला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीच्या सभेतून, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी, धनंजय मुंडेंच्या खात्यावरून त्यांचं 32 नंबरचं खातं आहे. असं म्हणत टीका केली होती. तर आता पुन्हा खासदार प्रीतम मुंडे यांनी खात्यावरून, "एकचं खातं आहे". कुठं चार खाते आहेत. असं म्हणत टोला लगावल्याने, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com