पाणीपुरवठ्यात पडणार खंड; जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

शहराला पाणीपुरवठा करणारी तापी जलवाहिनी काल दुपारी अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
Dhule News
Dhule NewsSaam Tv

धुळे - शहराला पाणीपुरवठा करणारी तापी जलवाहिनी काल दुपारी अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. तापी नदीतून धुळे येथे गेलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचा पाईप कमखेडा फाट्याजवळ फुटल्याने हजारो लिटर पाणी जवळील शेतात वाहत होते.

हे देखील पाहा -

पाण्याचा फवारा ईतका मोठा होता की मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांनी ही बघण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी अचानक पाईप फुटल्याने हजारो लिटर पाणी खाली वाहत होते. त्यानंतर पाणी पुरवठा विभागातर्फे यासंदर्भात संध्याकाळी जलवाहिनी बंद करण्यात आली व त्यानंतर युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. त्यानंतर रात्री पाईपलाईन सुरळीत करण्यात आली आहे.

Dhule News
विरार मध्ये फर्निचरच्या दुकानाला आग; 8 ते 10 दुकानं जळून खाक

या जलवाहिनी फुटल्याने नंतर अक्षरशः पाण्याचे उंच उंच कारंजे बघावयास मिळाले. ऐन उन्हाळ्यात पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com