Measles Outbreak : मुंबईनंतर आता ठाण्यात सुद्धा गोवरचा शिरकाव; 22 संशयित रुग्ण

गोवर रुग्णांच्या उपचारासाठी ठाणे महानगर पालिका सज्ज
Measles Disease
Measles DiseaseSaam Tv

Measles News : मुंबईनंतर (Mumbai) आता ठाण्यात (Thane) सुद्धा एक ते सहा वयोगटातील गोवरचे 22 संशयित रुग्ण आढळून आले आहे. या गोवर (Measles Disease) रुग्णांच्या उपचारासाठी ठाणे महानगर पालिका सज्ज असून या बाधितांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यातील भिवंडी परिसरात गोवर बाधित किंवा संशयित बालकांची संख्या जास्त आढळून आली असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिकेकडून उपचार सुरू आहेत.

या गोवर वर आळा बसावा यासाठी मागील चार दिवसापासून ठाण्यातील भिवंडी, मुंब्रा, कौसा आणि इतर भागांमध्ये ठाणे महापालिका, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्याकडून गोवर लसीकरण संदर्भात सर्वेक्षण केले जात आहे. ठाण्यात देखील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे 10 आयसोलेशन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.

Measles Disease
Nashik News: तृतीय वर्षाच्‍या विद्यार्थ्याची हॉस्‍टेलमध्‍ये आत्महत्या

वेळ पडल्यास ठाण्यातील कोविद सेंटर म्हणून उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझा येठे देखील बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्या या गोवरसाठी लागणारा लसीकरणाचा साठा उपलब्ध असून वेळ आल्यानं आणखीन लस उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी सांगितले.

गोवर म्हणजे काय?

गोवर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो. तो प्रथम कोणत्याही व्यक्तीच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. औषध आणि लसीकरणाने हा आजार टाळता येतो. जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे 'गोवर' हा आजार. 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये संपूर्ण जगात सुमारे 1 लाख 10 हजार लोकांचा मृत्यू केवळ गोवरमुळे झाला. त्यापैकी बहुतेक मुले (Child) होती आणि त्यांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी होते.

हा विषाणू 'Paramyxovirus' कुटुंबातील आहे, जो पहिल्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासाच्या नलिका आणि संपूर्ण श्वसन प्रणालीला संक्रमित करतो. नंतर ते शरीराच्या इतर भागात पसरते. WHO च्या म्हणण्यानुसार, भारतात गोवरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सन 2022 मध्ये सप्टेंबर महिन्यात देशात गोवरचे 11 हजार 156 रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७९ टक्के वाढ झाली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे 2022 मध्ये गोवरचे रुग्ण अवघ्या दोन महिन्यांत दुप्पट झाले आहेत.

गोवरची सुरुवातीची लक्षणे कोणती?

  • गोवरचे प्रारंभिक लक्षण म्हणजे तीव्र ताप. जर एखाद्या व्यक्तीला खूप ताप येत असेल तर समजावे की गोवरने त्याचे पहिले लक्षण दिले आहे.

  • विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर 10-12 दिवसांनी ताप सुरू होतो आणि नंतर 4 ते 7 दिवस टिकतो.

  • एखाद्या व्यक्तीला खोकला, नाकातून पाणी येणे, डोळे लाल होणे, घसा खवखवणे आणि तोंडात पांढरे ठिपके असू शकतात. यासोबतच शरीरावर लाल पुरळ येणे ही गोवरची लक्षणे असू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com