शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं! ढगफुटीने पिके गेली वाहून

अतिवृष्टीने अकोले तालुक्यात पिकांसोबत शेती वाहून गेली.
अतिवृष्टीने अकोले तालुक्यात पिकांसोबत शेती वाहून गेली.

अकोला - अकोल्यातील काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाने पातूर, नंदापूर, सोनखास, बोरगाव परिसरात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पीक पूर्णपणे वाहून गेले आहे. या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची आस लागली आहे. Massive crop damage due to heavy rains in Akola

यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर बरसल्याने शेतकऱ्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणी केली. मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरा झाला. पिकाची उगवणही चांगली झाली होती. परंतु जोरदार झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील शेतीत पाणी साचले आहे. काही भागातील शेतीचे बांध फुटल्याने मातीही वाहून गेलीय. हातचे पीक गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अतिवृष्टीने अकोले तालुक्यात पिकांसोबत शेती वाहून गेली.
गायीला बसायला गादी! विदर्भातील भक्त गावाने बांधलंय गो मंदिर

मुसळधार पावसामुळे पातूर नंदापूर, सोनखास, बोरगाव खुर्द येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे नदी नाल्याच्या काठावरील शेती पूर्णतः वाहून गेली. तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून सोयाबीन, मूग, उडीद, तूर ही पिके खराब सडण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलीय. या बाबत जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांना निवेदन दिले आहे. तसेच या शेतीचे तत्काळ पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत देण्यात यावे, अशी मागणी ही केली आहे. यावेळी चंद्रशेखर गवळी, रामहरी आगळे, मंगेश भातुलकर, नाना लळे व इतर शेतकरी उपस्थित होते.Massive crop damage due to heavy rains in Akola

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com